बॉलिवूडमधील अनेक चित्रपट परदेशातही हिट होत असल्याचे पाहायला मिळते. कलाकार त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतात. त्यामुळे या कलाकारांची लोकप्रियता सातासमुद्रापार असल्याचे पाहायला मिळते. नुकताच बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशनचा ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष २०१९’च्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटनच्या इस्टर्न आय या मॅगझिनने ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुषा’च्या नावासाठी ऑनलाइन पोल घेतला होता. यामध्ये बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला सर्वाधिक मते मिळाली आहेत. गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक मते मिळवत हृतिकने ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष २०१९’चा मान मिळवला आहे.

हा मान मिळवल्यानंतर हृतिकने सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्वांचे आभार मानले आहेत. ‘सर्वप्रथम मला मत दिलेल्यांचे मनापासून आभार. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये व्यक्तीचे दिसणे माझ्यासाठी महत्त्वाचे नसते. मी एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरुन परिक्षण करत नाही. त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात काय मिळवले आहे, त्याचा जीवन प्रवास कसा होता आणि एखाद्या गोष्टीला ती व्यक्ती कशी सामोरी जाते हे मी पाहतो’ असे हृतिक म्हणाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshan voted sexiest asian male of the decade avb
First published on: 05-12-2019 at 12:24 IST