दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या विनंतीमुळे बॉलीवूड शेहनशहा अमिताभ बच्चन ‘क्रीश ३’ चित्रपटासाठी त्यांचा आवाज देणार आहेत. ‘क्रिश ३’ हा ‘कोइ मिल गया’ चित्रपटाचा तिसरा भाग आहे.
“पहाटे सात वाजता उठलो आणि ‘क्रिश ३’ च्या डबिंगसाठी गेलो. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आणि हृतिकचे पिता राकेश रोशन यांनी त्यांच्या चित्रपटाला आवाज देण्याकरिता विचारले होते. त्यासाठी मी होकार दिला आणि आता हे काम झाले,” असे अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहले आहे. याचसोबत अमिताभ ‘कौन बनेगा करोडपती’च्या सातव्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
‘क्रिश ३’मध्ये हृतिकसोबत विवेक ऑबरॉय, प्रियांका चोप्रा आणि कंगना रणावत यांच्याही भूमिका आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 25th Aug 2013 रोजी प्रकाशित
‘क्रिश ३’ला अमिताभ यांचा आवाज
दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या विनंतीमुळे बॉलीवूड शेहनशहा अमिताभ बच्चन 'क्रीश ३' चित्रपटासाठी त्यांचा आवाज देणार आहेत.
First published on: 25-08-2013 at 05:22 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshans krissh 3 will have amitabh bachchans voiceover