(फोटो अल्बम पाहा)विद्या बालनबरोबर दुस-यांदा काम करणा-या इमरान हाश्मीचे म्हणणे आहे की, तो विद्याचा फार मोठा चाहता असून, त्याला विद्याचा साधेपणा खूप भावतो. विद्याला 'डर्टी पिक्चर'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. आता 'घनचक्कर' या विनोदी चित्रपटात पुन्हा दोघे एकत्र दिसणार आहेत.काल रात्री मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत इमरान म्हणाला, मी विद्याचा फार मोठा चाहता असून, मला तिचा साधेपणा खूप भावतो. ती विविध प्रकारचे चित्रपट करते आणि योग्य चित्रपट निवडीतच तिचे वेगळेपण आहे.इमरानचे कौतुक करताना विद्या म्हणाली, 'घनच्चक्कर' चित्रपटामधील इमराचा अभिनय हे त्याचे आत्तापर्यंतचे सर्वोत्तम काम आहे. तो नाविन्यपूर्ण आणि मनोरंजन करणारे चित्रपट करत आहे. असे असले तरी त्याच्या विषयीची विद्याची एक तक्रार आहे ती म्हणजे तो हसत नाही. असे अनेक प्रसंग आले जेव्हा विद्या दिलखुलास हसली. परंतु, इमरानच्या चेह-यावर कोणतेच भाव नव्हते.या विषयी इमरान म्हणतो, चित्रपटात त्याने साकारलेल्या नकारात्मक आणि रागिट भूमिकांचा हा परिणाम आहे, ज्यामुळे तो प्रत्यक्ष जीवनात देखील एक गंभीर माणूस झाला आहे. कदाचित या कारणामुळेच त्याला गोष्टी हास्यास्पद वाटत नाहीत आणि तो हसत नाही. यासाठी त्याला काही हलके-फुलके चित्रपट करायचे आहेत. घनच्चक्कर चित्रपट २८ जून रोजी प्रदर्शित होत आहे.