काळवीट शिकार प्रकरणात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने नुकताच दिलासा दिला होता. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमान खानची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. त्यानंतर आज सलमान खानने पुन्हा एकदा काळवीट शिकारप्रकरणी जोधपूर न्यायालयात जवाब नोंदवण्यासाठी हजेरी लावली होती. यावेळी सलमानने तो निरपराध असल्याचे म्हटले.

सलमानने आज न्यायालयात त्याच्यावर असलेले सर्व आरोप फेटाळून लावले. सलमानला विचारण्यात आलेल्या ६५ प्रश्नांची उत्तरे देताना त्याने आपल्याला वन विभागाकडून या प्रकरणी मुद्दामहून गोवण्यात येत असल्याचे म्हटले. मी निरपराध असून, माझ्यावर खोटा आरोप केला जात आहे, असे सलमानने न्यायालयात म्हटले. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी वन विभाग आपल्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्याने म्हटले. यावेळी अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम हेसुद्धा उपस्थित होते. गेल्या वर्षभरात सलमानला बऱ्याच खटल्यांना सामोरे जावे लागले. काळवीटची शिकार करणे, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे आणि शस्त्रास्त्रांचा गैरवापर अशा विविध कलमांखाली सलमान खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

mumbai, Brother Killed, Jogeshwari East, House Redevelopment Dispute, murder case, murder in jogeshwari, murder in mumbai, crime news, crime in mumbbai, crime in jogeshwari, marathi news,
पुनर्विकासाच्या वादातून जोगेश्वरी येथे भावाची हत्या, आरोपीला मेघवारी पोलिसांकडून अटक
mumbai high court gang rape marathi news
गंभीर स्वरूपाच्या खटल्यांना विलंब हा जामिनाचा आधार नाही, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
navneet rana and congress candidate rashmi barve
एकाच मुद्यावरील न्यायालयाच्या निर्णयाने एक निवडणूक रिंगणात तर दुसरी रिंगणाबाहेर

१९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कंकणीजवळ सलमान व त्याच्या सहकाऱ्यांनी चिंकारा काळविटाची शिकार केल्याचा आरोप होता. बिष्णोई समाजाच्या तक्रारीनंतर २ ऑक्टोबर १९९८ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १२ ऑक्टोबरला सलमानला अटकही करण्यात आली होती. मात्र, पाच दिवसांनी त्याची जामिनावर सुटका झाली होती. २००६ मध्ये वन्य प्राणी कायद्यानुसार जोधपूर येथील भवद जवळ चिंकाराची शिकार केल्या प्रकरणी सलमानला एक वर्ष कारावास आणि ५००० रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सलमान व्यतिरिक्त अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यावर देखील दोन काळविटाची शिकार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. काळवीटची शिकार करणे, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे आणि शस्त्रास्त्रांचा गैरवापर अशा विविध कलमांखाली सलमान खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजस्थान हायकोर्टाने गेल्यावर्षी जुलैमध्ये सलमानची काळवीट शिकार प्रकरणातून निर्दोष सुटका केली होती. कोर्टाने सलमान खानच्या परदेशवारीवर निर्बंध घातले होते. मात्र राजस्थान सरकारने याविरोधात पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.