माझे नाव कोणासोबत जोडले जाते आहे, याकडे मी फारसे लक्ष देत नाही. जोपर्यंत माझ्या घरच्यांना, जवळच्या मित्रमैत्रिणींना सत्य परिस्थिती काय आहे, हे माहिती आहे तोपर्यंत अशा गोष्टींकडे लक्ष द्यायची मला गरजच वाटत नाही, हे मत आहे नुकतेच हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या अथिया शेट्टी हिचे. अथियाला चित्रपटसृष्टीत येऊन एक वर्षे होत असले, तरी तिच्याबद्दल विविध गॉसिप सुरू झाल्याने ती चर्चेत आली आहे.
‘हिरो’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अथिया अभिनेता अर्जुन कपूरसोबत डेटिंग करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हे दोघेही मुंबईमध्ये एका पार्टीत एकत्र दिसले होते. त्यावरून या चर्चेला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अथियाने या चर्चांवर उत्तर दिले. ती म्हणाली, माझे नाव कोणासोबत जोडले जाते, याकडे मी फारसे लक्ष देत नाही. जोपर्यंत माझ्या घरच्यांना, जवळच्या मित्रमैत्रिणींना सत्य परिस्थिती काय आहे, हे माहिती आहे तोपर्यंत अशा गोष्टींकडे लक्ष द्यायची मला गरजच वाटत नाही.
माझे बाबा अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत आहेत. त्यामुळे सेलिब्रिटी झाल्यावर हे सर्व ओघाने येतेच, हे त्यांना माहिती असल्याचे अथियाने म्हटले आहे. पण आपण अशा चर्चांना फार महत्त्व देत नाही, असेही तिने स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2016 रोजी प्रकाशित
‘माझे नाव कोणासोबत जोडले जाते, याकडे फारसे लक्ष देत नाही’
अथिया अभिनेता अर्जुन कपूरसोबत डेटिंग करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे
Written by वृत्तसंस्था

First published on: 16-03-2016 at 18:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I dont take link up rumours seriously athiya shetty