बॉलिवूडचा नवाज सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांचा मुलगा इब्राहिम अली खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चर्चा त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमुळे सुरु झाल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये इब्राहिमने हेरा फेरी या चित्रपटातील एक सीन रिक्रिएट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इब्राहिमने हेरा फेरी चित्रपटातील अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांचा एक डायलॉग रिक्रिएट केला आहे. त्यात त्याने राजू सोबतच बाबू भैया यांचा डायलॉग म्हटला आहे. पण इब्राहिम अक्षय राजू आणि बाबू यांची मस्त नक्कल करताना दिसत आहे. त्याचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

त्याचा हा व्हिडीओ वूंपलाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी, ‘ये बाबूराव का स्टाइल है’ असे म्हटले आहे. इब्राहिमचा हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला असून त्यांनी व्हिडीओवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ibrahim ali khan recreates akshay kumar and paresh rawal film scene hera pheri video viral avb
First published on: 28-04-2020 at 19:35 IST