‘पोश्टर गर्ल’चे पोस्टर प्रदर्शित झालेआणि सगळ्यांच्या ओठावर बसली या चित्रपटाची टॅगलाइन ती म्हणजे ‘अख्या गावासाठी येकच बस – पोश्टर गर्ल’चित्रपटाच्या पहिल्या – वहिल्या पोस्टरमध्ये ही अनोखी टॅगलाइन देण्याचे कारण म्हणजे संपूर्ण गावात असणारी एकुलती एक मुलगी. जिची भूमिका बजावली आहे सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीने.
चित्रपटात सोनाली एकमेव अभिनेत्री आहे. पण या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानही ती एकटीच होती. एकंदर १० पुरूष कलाकारांच्या गोतावळ्यात हे चित्रिकरण पार पडले. याचे कितपत दडपण आले होते असा प्रश्न केला असता ती म्हणाली, ‘धमाल, मजा आणि मस्तीमध्ये हे चित्रीकरण झाले, चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासूनच आमचं ट्युनिंग खूप छान जमलं होतं त्यामुळे दडपण येण्याचा प्रश्नच नव्हता.’ त्याशिवाय चित्रपटात आणि सेटवर एकुलती एक असल्याने खूप लाड झाल्याचा आनंदही तिने व्यक्त केला.
अमितराज यांनी या चित्रपटाला संगीत दिले असून क्षितिज पटवर्धन यांनी या चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत. समीर पाटील दिग्दर्शित अशी ही एकुलती एक….वायकॉम18 मोशन पिक्चर्स आणि चलो फिल्म बनायें यांची ‘पोश्टर गर्ल’. १२ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Feb 2016 रोजी प्रकाशित
‘पोश्टर गर्ल- अख्या गावासाठी येकच बस’ शीर्षकामागचे रहस्य
पोस्टरमध्ये ही अनोखी टॅगलाइन देण्याचे कारण
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 05-02-2016 at 13:30 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Idea behind the poshter girl movie name title