करोनाचा अधिकाधिक प्रसार होऊ नये यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. अत्यावश्यक वस्तूंची खरेदी वगळता घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. मात्र तरीही या सूचनांचं पालन न करता अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. सेलिब्रिटीसुद्धा नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन करत आहेत. नागरिकांवर पोलिसांचीही करडी नजर आहे. तरीसुद्धा काहीजण लॉकडाउनचा नियम मोडताना दिसत आहेत. अशा लोकांसाठी आता पोलिसांनी अजब शक्कल लढवली आहे. जयपूर पोलिसांनी यासंदर्भात केलेलं एक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विनाकारण घराबाहेर पडल्यास जयपूरमधील नागरिकांना अजब-गजब शिक्षा होणार आहे. त्यांना मसक्कली २.० हे नवीन गाणं सतत ऐकवण्यात येणार आहे. ही अशी कोणती शिक्षा असते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून ‘दिल्ली ६’ या चित्रपटातील ए. आर. रेहमान यांच्या ‘मसक्कली’ गाण्याचं नवीन व्हर्जन आहे. मात्र हे नवीन गाणं कोणाच्याच पसंतीत उतरलं नाही. अनेकांनी या रिमेकवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना आता हेच गाणं सतत ऐकवण्यात येणार असल्याचं ट्विट जयपूर पोलिसांनी केलं.
मत उडियो, तू डरियो
ना कर मनमानी, मनमानी
घर में ही रहियो
ना कर नादानीऐ मसक्कली, मसक्कली#StayAtHome #JaipurPolice #TanishkBagchi #Masakali2 #ARRahman @arrahman @juniorbachchan @sonamakapoor @RakeyshOmMehra pic.twitter.com/lYJzXvD8i4
— Jaipur Police (@jaipur_police) April 9, 2020
आणखी वाचा : शाहरुखने महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेससाठी केली २५ हजार PPE किट्सची मदत
जयपूर पोलिसांच्या या ट्विटला नेटकऱ्यांनी विशेष दाद दिली आहे. अनेकदा जनजागृती करूनही जर काहीजण ऐकणार नसतील तर मग अशी शक्कल लढवणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.