तिचा प्रवास ब्युटी क्वीन म्हणून सुरु झाला. त्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री, आंतरराष्ट्रीय पातळीवरील गायिका आणि आता हॉलीवूड अभिनेत्री म्हणून तिची ख्याती आहे. प्रियांका चोप्राचा हा यशस्वी प्रवास नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. पण प्रियांकाला आपल्या यशाची कथा वाचायाला आवडत नाही. तिच्या मते ही सर्व प्रसिद्धी आणि वैभव एक दिवस दूर जाणारे आहे.
प्रियांकाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इन माय सिटी या अल्बमने पाश्चिमात्य देशात प्रसिद्धी मिळवली. यानंतर तिने क्वांटिको ही प्रसिद्ध टीव्ही मालिका केली. या मालिकेने तर तिला यशाच्या शिखऱावर नेऊन पोहचवले. त्यानंतर प्रियांकाने कधीही मागे वळून पाहिले नाही. आता तर ती बेवॉच या चित्रपटाद्वारे हॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासही सज्ज झाली आहे. सध्या आयफा पुरस्कार सोहळ्याची चर्चा आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रियांका माद्रीद येथे पोहचली आहे. त्यावेळी एका मुलाखती दरम्यान प्रियांका म्हणाली की, आपण जसे आहोत तसे राहावे यावर मी विश्वास ठेवते. मी कधीच यशाला गृहीत धरत नाही आणि कुणीच तसे करताही कामा नये. कारण यश हे क्षणार्धात नाहीसे होते. नक्कीच माझ्यासोबतही कधीनाकधी असे होईल. पण आज मी एक यशस्वी व्यक्ती आहे. तरुणांनी केवळ एकाच गोष्टीत अडकून न राहता प्रत्येकाने वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण आता अशा वेळेत जगतोय जिथे कोणीही कधीही काहीही काम करु शकतं आणि त्यासाठी कोणतीचं वयोमर्यादा नाही. तुम्ही केवळ योग्य विचार करण्याची गरज आहे, असे प्रियांकाने म्हटले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jun 2016 रोजी प्रकाशित
IIFA 2016: माझे यश फार काळ टिकणार नाही- प्रियांका चोप्रा
यश हे क्षणार्धात नाहीसे होते.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 24-06-2016 at 13:31 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iifa 2016 my success wont last forever priyanka chopra