हॉलिवूड चित्रपटांमध्ये आता भारतीय कलाकारांचाही ठसा उमटू लागला आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या “द अमेझिंग स्पायडरमॅन २’ या चित्रपटात भारतीय अभिनेता प्रशांत राय काम करत असून त्याने पर्यटकाची भूमिका साकारली आहे.
“द अमेझिंग स्पायडरमॅन २’मध्ये प्रशांतने जेमी फॉक्स, अँन्ड्रयू गार्फिल्ड एमा स्टोन यांच्यासोबत काम केले. हॉलीवूड अभिनेत्यांसोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय असल्याचे प्रशांतने म्हटले आहे. इतकेच नाही तर चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी विवेक ओबेरॉयने आवाज दिला आहे. मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जेमी फॉक्स यांच्या हिंदीतील स्पायडरमॅनसाठी विवेक ओबेरॉयने संवाद म्हटले आहेत. त्यांच्या इंग्लिश संवादांशी मिळत्याजुळत्या ओठांच्या हालचाली करत संवाद म्हणणे अतिशय अवघड काम असल्याचे विवेकने पत्रकारांना सांगितले. परंतु, हे काम आल्यानंतर मी खूप आनंदी होतो आणि आता ते पूर्ण झाल्याने मी खूष असल्याचे त्याने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2014 रोजी प्रकाशित
“द अमेझिंग स्पायडरमॅन २’मध्ये भारतीय अभिनेता प्रशांत राय
हॉलिवूड चित्रपटांमध्ये आता भारतीय कलाकारांचाही ठसा उमटू लागला आहे.
First published on: 22-04-2014 at 11:09 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian actor prashant rai on working in the amazing spieder man