परफेक्ट डान्स सर्वांनाच जमतं असं नाही. पण प्रत्येकजण आपापल्या परीने नक्कीच डान्स करतो आणि त्या क्षणांचा मनमुराद आनंद लुटतो. किंबहुना आनंद व्यक्त करण्याचाच एक प्रकार डान्स आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच लग्न असो, पार्टी असो किंवा मिरवणूक, नाचण्याची संधी कोणीच सोडत नाही. त्यातूनच वरातीतला डान्स, गणपतीचा डान्स असे भन्नाट प्रकारसुद्धा तयार झाले. याबाबतीत बॉलिवूडने आपल्याला बरंच काही दिलं आहे. बॉलिवूडच्या गाण्यांमधील काही स्टेप्स इतके गाजले की त्या त्या कलाकारांच्या नावाने ते स्टेप्स ओळखू जाऊ लागले. तर मग तुम्ही कधी पार्टीत, मिरवणुकीत किंवा वरातीत या अफलातून स्टेप्सवर थिरकलात का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल कपूर अनिल कपूर यांची ही प्रसिद्ध डान्स स्टेप अनेकांनाच ठाऊक आहे. ही स्टेप अनिल कपूर स्टेप म्हणूनच ओळखू जाऊ लागला.

धर्मेंद्र- अभिनेते धर्मेंद्र यांना तसं फारसं नाचता येत नाही. पण त्यांच्या या स्टेपचे बरेच चाहते आजच्या पिढीतील तरुणही आहेत.

हृतिक रोशन- ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून हृतिकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच चित्रपटातील ‘एक पल का जीना’ गाण्यातील ही स्टेप तुफान गाजली.

माधुरी दीक्षित- ‘एक दो तीन’ हे ‘तेजाब’ चित्रपटातील गाणं चांगलंच गाजलं होतं. नुकतंच त्याचं नवीन व्हर्जन ‘बागी २’ या चित्रपटात पाहायला मिळालं. मात्र माधुरीची ही स्टेप आजही तितकीच लोकप्रिय आहे.

सलमान खान-  ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातील ‘जीने के है चार दिन’ गाण्यामधील सलमानचा टॉवेल डान्स खूप गाजला.

रणवीर सिंग-  ‘बाजीराव मस्तानी’मधील मल्हारी या गाण्याला सुरुवातीला बराच विरोध झाला. मात्र, जेव्हा हे गाणं प्रदर्शित झालं, तेव्हा रणवीरच्या डान्सने अनेकजण भारावून गेले. ‘मल्हारी’च्या या स्टेपवर तुम्ही कधी थिरकलात का?

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International dance day have you danced on these crazy and famous bollywood dance steps signature steps
First published on: 29-04-2018 at 13:19 IST