कॉरिओग्राफर धर्मेश येलांदे हा धर्मेश सर या नावाने सर्वत्र प्रसिद्ध आहे. झी वाहिनीवरील डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोने धर्मेशला प्रसिद्धी मिळाली. तेव्हापासून या नृत्य दिग्दर्शनकाने नृत्याची आवड असलेल्या सर्वच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. आज त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. पण धर्मेशची एक खास चाहतीदेखील आहे. सध्या धर्मेश सर (त्याचे चाहते त्याच्या नावापुढे ‘सर’ असे लावतात) हा एका सुंदर मुलीला डेट करत असल्याची चर्चा आहे. धर्मेशच्या या लेडी लव्हचे नाव आहे ब्रेश्ना खान. बॉलीवूड डबस्मॅशमुळे ब्रेश्ना ही प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
ब्रेश्नाने बॉलीवूडमधील हिट चित्रपट असेलल्या ‘अंदाज अपना अपना’, ‘हेरा फेरी’, ‘एक और एक ग्यारह’ आणि अशा अन्य काही चित्रपटांवर तिने डबस्मॅश केले होते. सध्या धर्मेश आणि ब्रेश्ना हे दोघेही एकमेकांना डेट करत असून त्यांनी आपल्या नात्याची वाच्यता करण्यासही सुरुवात केली आहे. ब-याचदा ते एकत्र दिसतात. धर्मेश ज्यावेळी डान्स इंडिया डान्समध्ये होता तेव्हाही ब्रेश्ना त्याच्यासोबत होती असे त्यांच्या इन्स्टाग्राम फोटोंकडे पाहता तरी वाटते. हे प्रेमीयुगुल लवकरच लग्नबंधनातही अडकणार असल्याचीही चर्चा होती. पण धर्मेशच्या कुटुंबाकडून त्यांच्या लग्नाला परवानगी नसल्याचे म्हटले जातेय.
सध्या धर्मेश स्टार प्लस वाहिनीवरील रिमो डिसोजाच्या ‘डान्स प्लस २’ या रिअॅलिटी शोमध्ये मेन्टॉरच्या भूमिकेत आहे. त्याने ‘डान्स प्लस’च्या पहिल्या सिजनमध्येही मेन्टॉरची भूमिका बजावली होती. त्याचसोबत त्याने ‘एबीसीडी’ आणि ‘एबीसीडी २’ हे दोन चित्रपटही केले. एक उत्कृष्ट डान्सर म्हणून धर्मेशची ओळख आहे. रवि जाधव दिग्दर्शित आगामी ‘बॅण्जो’ या चित्रपटातही धर्मेश महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
A photo posted by D (@dharmesh0011) on
Grooving with @dharmesh0011 😜 #imaginarygirl @imrankhanworld
A video posted by @breshna_h_khan on
Welcome to India Didi @grzmotbilska. N my baby @breshna_h
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Hahahahahahahahahhaahha. @grzmotbilska @breshna_h_khan @harsh8harsh @rahuldid @paulmarshal
A video posted by D (@dharmesh0011) on