अभिनेता आमिर खानचा भाचा इमरान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. इमरान चित्रपटसृष्टीपासून लांब असला तरी त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. अवंतिका ही इमरानची गर्लफ्रेंड होती. अनेक वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण आता त्या दोघांनी घटस्फोट घेतल्याच्या चर्चा रंगल्या आहे. इमरान आणि अवंतिकाने यावर अद्याप वक्तव्य केलेले नाही. त्या दोघांमध्ये एका अभिनेत्रीमुळे वाद सुरु झाले असल्याचे म्हटले जात आहे.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, इमरान खान गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्या अभिनेत्री लेखा वॉशिंगटनला डेट करत आहे. लेखाचा पती आणि इमरान हे चांगले मित्र असल्याचे म्हटले जात आहे. अद्याप इमरानने या चर्चांवर वक्तव्य केलेले नाही. लेखा आणि इमरानने ‘मटरु की बिजली का मन डोला’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटात लेखाने इमरानच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवंतिका आणि इमरानने २०११मध्ये लग्न. त्यांना एक मुलगी देखील आहे. पण त्यांच्यामध्ये वाद झाल्यामुळे अवंतिकाने इमरानचे घर सोडले. आता इमरान लेखाला डेट करत असून त्याच्या मित्रमैत्रीणींशी ओळख करुन देत आहे अशा चर्चा रंगल्या आहेत.