छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस.’ या मालिकेने १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये चर्चा रंगली ती म्हणजे देवमानूसच्या दुसऱ्या भागाची. अखेर प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली आणि नुकतंच देवमाणूस या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार असल्याची बातमी मिळाली. मालिकेचा शेवट ज्या प्रकारे दाखवण्यात आला ते पाहून मालिकेचा दुसरा सिझन लवकरच येणार असल्याचे म्हटले जात आहे.

झी मराठी वाहिनीवर आणि सोशल मीडियावर देवमाणूस या मालिकेच्या दुसऱ्या सिझनच्या प्रोमोची झलक प्रेक्षकांनी पाहिली. आता या मालिकेच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह देखील मैदानात उतरला आहे. रणवीरचा एक व्हि़डीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि या व्हि़डीओला देखिल चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.
आणखी वाचा : पुनीत राजकुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार? निर्माते संतोष म्हणाले…

व्हायरल झालेल्या या व्हि़डीओमध्ये मालिकेला फीट बसणारा एक डॉयलॉग रणवीर म्हणाताना दिसत आहे. रणवीर सिंह म्हणतो की, “अख्खा पब्लिक को मालूम है, कौन आनेवाला है, तेरे को नही मालूम…” सूर्यवंशी सिनेमातील रणवीरचा हा डायलॉग चांगलाच फेमस आहे. रणवीर हा डायलॉग बोलत असतानाचा सूर्यवंशीमधला व्हिडीओ वापरुन एक नवा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवमाणूस मालिकेत डिम्पलची भूमिका साकारणीर अभिनेत्री अस्मिताने हा व्हि़डीओ इन्स्टावर शेअर केला आहे. अस्मिताने हा व्हि़डीओ शेअर करत ‘देवमाणूस २ सूर्यवंशी स्टाईलमध्ये’ असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ प्रेक्षकांना देखील खूप आवडला आहे. हा व्हि़डीओ पाहिल्यानंतर अनेकांनी मालिकेची वाट पाहत असल्याची कमेंट केली आहे.