टेलिव्हिजन विश्वात भारती सिंग हे नाव सध्या सर्वांच्याच ओळखीचं झालं आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणारी ही भारती आज बरीच नावाजली गेली आहे. सध्याच्या घडीला ती कपिल शर्माच्या शोमध्ये आपल्या विनोदाची आतिषबाजी करण्यासाठी सज्ज असून ती या कार्यक्रमासाठी स्वत:ला झोकून देत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता ती एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती ‘कॉमेडी दंगल’ या शोची प्रशिक्षक म्हणून एक नवी जबाबदारी पार पाडणार आहे.

बलात्काराचा बनाव रचणाऱ्या पुण्यातील ‘क्राईम पेट्रोल’ फेम अभिनेत्रीला बेड्या

हा एक स्टॅण्ड अप कॉमेडी शो आहे. ‘कॉमेडी दंगल’ नावाने येणारा हा शो अॅण्ड टिव्हीवर प्रक्षेपित केला जाणार आहे. या कार्यक्रमात दोन टीम असतील. त्यातील एक टीम भारतीची असेल तर दुसरी टीम टिव्ही कलाकाराची असेल. भारतीने नुकतेच सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा प्रोमो प्रसिद्ध केला.

‘स्पॉटबॉय’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, नुकतेच भारतीने कपिल शर्माच्या चमूत प्रवेश केला. तिच्या येण्याचा फारसा आनंद किकूला होणार नाही असं असे सुरुवातीला वाटलं होतं. कारण ‘कॉमेडी सर्कस’ या शोमध्ये भारतीमुळेच किकूला बाहेरचा रस्ता पाहावा लागला होता. त्यामुळे आता कॉमेडी शोमध्ये भारतीच्या एण्ट्रीने किकू कसा प्रतिसाद देईल असाच प्रश्न अनेकांच्या मनात होता. पण प्रत्यक्षात मात्र किकू आणि भारती यांनी भूतकाळातील आपली भांडणं विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला असावा असेच वाटते.

एकदा हा व्हिडिओ पाहाच, तुमचीही नजर तिच्यावरुन हटणार नाही