आपल्या जबरदस्त फाइटिंगच्या प्रात्याक्षिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेता जॅकी चॅन यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीला मोठ्या उसाहात सुरुवात केली आहे. सोमवारी भारतात दाखल झालेल्या जॅकी चॅन यांचे मुंबई विमानळावर मोठ्या उत्सहात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी आलेला या चित्रपटातील त्यांचा सहअभिनेता सोनी सूदही आनंदात दिसत होता. जॅकी चॅन यांच्या भारत सफरीमुळे सध्या त्यांच्या चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईत आल्यानंतर जॅकी चॅन यांनी सलमान खानची भेट घेतली. त्यांच्या या भेटीचा सुंदर फोटो सलमानने ट्विट केला आहे. या फोटोत दोघांच्याही हातात पांडा हे सॉफ्ट टॉय असलेले दिसते.
— Salman Khan (@BeingSalmanKhan) January 23, 2017
दरम्यान, जॅकी चॅन हे त्यांच्या ‘कुंग फू योगा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्येही सहभागी झाले. जॅकी चॅनसोबत बॉलिवूड अभिनेता सोनू सूदही या शोमध्ये दिसणार आहे. नुकतेच त्यांच्या या एपिसोडचे चित्रीकरण पूर्ण झाले असून कपिल शर्माने ट्विटरवरून त्याचा आनंद व्यक्त केला आहे. त्याने ट्विट केले की, हे एखादे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. जॅकी सरांना माझ्या सेटवर घेऊन येण्यासाठी सोनू तुझे धन्यवाद. खूप सारे प्रेम आणि बेस्ट ऑफ लक.
It's like a dream come true.. thank u brother @SonuSood for bringing @EyeOfJackieChan sir.. lots of love n best wishes always :)))
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) January 23, 2017
काही दिवसांपासूनच जॅकी चॅन भारत दौऱ्यावर येणार अशा चर्चा बी टाऊनमध्ये रंगत होत्या. सोनू सूदनेही जॅकी चॅन यांच्या भारत दौऱ्याविषयीची रुपरेषा अनेकांसमोर उघड केली होती. त्यासोबतच जॅकी चॅन यांची सलमान खानला भेटण्याची इच्छा असल्याचेही त्याने सांगितले होते असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केले आहे. विविध कलाकारांना नेहमीच पाठिंबा देणाऱ्या सलमान खानने काही दिवसांपूर्वीच जॅकी चॅन आणि सोनू सूद यांच्या ‘कुंग फू योगा’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला होता.