बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. कोणती अभिनेत्री कोणाला डेट करते याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. त्यातच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने ती कोणाला डेट करते याचा खुलासा केला आहे. आता चाहत्यांमध्ये जॅकलिनच्या नात्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच ‘इटाईम्स’ने घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये जॅकलिनला ती सिंगल आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर जॅकलिनने हास्यस्पद उत्तर दिले आहे. ‘मी माझ्या मांजरीला डेट करते. माझ्या कडे चार मांजर आहेत. तिचा पती आणि त्यांची दोन मुले देखील आहेत. आता हेच माझे कुटुंब आहे’ असे उत्तर तिने दिले आहे. जॅकलिनच्या या उत्तरावरुन एकंदरीत ती सिंगल असल्याचा निष्कर्ष लावला जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jacqueline fernandez talks about her relationship
First published on: 19-05-2019 at 15:19 IST