आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे जॅकलीन फर्नांडिस. जॅकलीनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून कायम ती चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली आहे. जॅकलीन चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. अनेक वेळा ती तिच्या आगामी चित्रपटांची माहिती सोशल मीडियावर देत असते. त्यासोबतच तिच्या डान्सचे व्हिडिओ, फोटोही शेअर करत असते. नुकताच जॅकलीनने एक डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जॅकलीनने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती बेली डान्स करताना दिसत आहे. ‘मर्डर २’ चित्रपटातील ‘आ जरा’ या गाण्यावर जॅकलीन थिरकत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत सादिका खानदेखील दिसून येत आहे. ही तर सुरुवात आहे. दबंग रिलोडेड दुबई. रिहर्सल विथ माय सादिका खान असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे.


जॅकलीनच्या बेली डान्सचा व्हिडिओ आतापर्यंत २० लाखापेक्षा अधिक जणांना पाहिला आहे. जॅकलीन सध्या तिच्या आगामी ‘ड्राइव्ह’ या चित्रपटामध्ये व्यस्त असून या चित्रपटाचं दिग्दर्शन तरुण मंसुखानी करत आहेत. या चित्रपटामध्ये जॅकलीनसोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट २८ जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रेस ३’ या चित्रपटात जॅकलीन झळकली होती. हा चित्रपट नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटामध्ये तिच्या व्यतिरिक्त अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम यांच्या मुख्य भूमिका होत्या. मात्र तगडीस्टार असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिवर म्हणावी तशी कामगिरी करु शकला नाही.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jacquline fernandez shares video of belly dance
First published on: 13-03-2019 at 17:17 IST