सध्या जगात करोना व्हायरसचे सावट पाहायला मिळते. जगभरात ३,८०,००० लोकांना करोनाची लागण झाली असून तब्बल १६,००० जणांचे बळी करोनाने घेतले आहेत. करोनाचा संसर्ग कलाकविश्वातील अनेक कलाकारांना झाल्याचे समोर आले. या यादीमध्ये जेम्स बॉण्ड फेम अभिनेत्री ओल्गा कुरिलेन्कोचा देखील नाव होते. ओल्काने करोना झाल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. आता तिने करोनावर मात केली असल्याचे समोर आले.
ओल्काने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने करोनाशी संघर्ष करतानाचा अनुभव सांगितला आहे. करोना चाचणी पॉझिटीव्ह येताच ओल्काने घरातच स्वत:चे विलगीकरण करुन घेतले होते. ‘मी आता पूर्णपणे बरी झाली आहे. एक आठवड्यापूर्वी मला ताप होता आणि माझे डोके प्रचंड दुखत होते. मी जास्तवेळ झोपूनच घालवला. दुसऱ्या आठवड्यात माझा ताप गेला. पण थोडा कफ आणि थकवा जाणवत होता’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले.
‘दुसऱ्या आठवड्यात मी एकदम ठिक झाले. माझा कफ बऱ्यापैकी कमी झाला. आता मी माझ्या मुलासोबत वेळ घालवत आहे’ असे ओल्काने म्हटले आहे. ओल्कालाने तिला करोना झाल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते. त्यानंतर तिने रुग्णालयात दाखल न होता स्वत:च्या घरातच एका रुममध्ये विलगीकरण करुन घेतले होते. आता तिने करोनावर मात केल्याचे समोर आले आहे.
४० वर्षीय ओल्काने टॉम क्रूजसोबत ‘ऑब्लिवियन’ आणि २००७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिटमॅन’ चित्रपटात काम केले आहे. नुकताच तिने ‘द बे ऑफ साइलेंस’चे चित्रीकरण पूर्ण केले आहे. तसेच ‘द रूम’, ‘मूव्हमेंटो’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. ओल्गा कुरिलेन्कोने हॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.