जस्लीन मथारूच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांनी मुलाखत दिली असून त्यांनी काही खुलासे केल आहेत. केसर मथारु यांनी त्यांनी जेव्हा अनूप जलोटा आणि जस्लीनने त्यांच्या नात्याचा खुलासा केला, तेव्हा आपल्याला आणि कुटुंबाला आश्चर्याचा धक्काच बसला असं सांगितलं. ‘मी या नात्याला कधीच स्विकारु शकत नाही. मी कधीच त्यांना आशिर्वाद देणार न नाही, आणि त्यांच्यापासून दोन हात लांब राहणंच पसंत करेन’, अशी प्रतीक्रिया केसर मथारु यांनी दिली आहे.
केसर मथारु यांनी सांगितलं की, ‘तीन ते चार वर्षांपूर्वी गाणं सुधारण्यासाठी आपणच जस्लीनची भेट अनूप जलोटांशी घडवून दिली होती. त्यांच्यात काहीतरी सुरु आहे याची मला किंवा कुटुंबाला साधी कल्पनाही नव्हती’.
पुढे त्यांनी सांगितलं आहे की, ‘मला सांगण्यात आलं होतं की दोघं गुरु आणि शिष्या म्हणून बिग बॉसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. जेव्हा कार्यक्रमात त्यांच्या नात्याची घोषणा झाली तेव्हा माझा आणि कुटुंबाचा विश्वासच बसत नव्हता’.
अनूप जलोटा आणि जस्लीन मथारुने बिग बॉसच्या प्रीमिअर नाइटमध्ये सलमान खानसमोर आपल्या नात्याचा खुलासा केला होता. बिग बॉसमधील दुसऱ्याच दिवशी झालेल्या पहिल्या टास्कमध्ये सदस्यांनी त्यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता ही जोडी जेव्हा बाहेर येईल तेव्हाच नेमकं काय खरं आणि काय खोटं हे समोर येईल.