कोण बाळासाहेब ?
का जाऊन द्या ?
ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला नंतर मिळतील !
पण तिळगुळ घेऊन गोड का बोला ?
ह्याचं मात्र उत्तर आम्ही सांगू शकतो !
आणि ते उत्तर आहे, ‘जाऊंद्या ना बाळासाहेब’ ह्या २०१६ मध्ये येणाऱ्या आगामी बिगबजेट मराठी चित्रपटाचं एडिटिंग पूर्ण झालंय संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर, म्हणून तिळगुळ घ्या आणि गोड बोला !
खरं तर , मुहूर्त साधण्यात ह्या चित्रपटाच्या टीमचा पहिल्यापासूनच हातखंडा आहे ! जेंव्हा अख्ख जग नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करत होतं तेव्हा ह्या टीमनं नवीन वर्षाच्या स्वागताचा क्षण साधून चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शेवटचा clap दिला ! ह्या चित्रपटाच्या निर्मितीचे अनेक क्षण जसे अविस्मरणीय आहेत तसाच हा चित्रपटही अविस्मरणीय ठरेल कारण हा चित्रपट अविस्मरणीय ठरण्यासाठी मराठीतल्या मोठमोठ्या दिग्गजांची कला पणाला लागलीये ! खरं तर या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच, संपूर्ण चित्रपटसृष्टीत सगळ्यांनाच ह्या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.
प्रतिभावंत गिरीश कुलकर्णीचं ताकदीचं लेखन, गिरीशच्याच तीक्ष्ण नजरेतून झालेलं काटेकोर दिग्दर्शन आणि चित्रपटातील प्रमुख भूमिकेत त्याचा झालेला कसदार अभिनय ह्या भन्नाट रेसेपितून निर्माण होणारी डिश म्हणजे चित्रपट खवैयांना एक चमचमीत मेजवानी असणार आहे. शिवाय गिरीश बरोबर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, रिमा, दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर, मनवा नाईक, पूर्वा पवार, नंदकिशोर चौगुले, श्रीकांत यादव, सविता प्रभूणे, भाऊ कदम, स्पृहा जोशी अशी सरस आणि अनुभवी कलाकारांची फौज या चित्रपटात पहायला मिळणार आहे. तसंच एच. एम. रामचंद्र ह्याचं छायांकन, अभिजित देशपांडे ह्याचं संकलन, अनमोल भावेच ध्वनी आरेखन, अशी कुशल तांत्रिक टीम ह्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी काम करतीये, आणि अजून एक खास आकर्षण म्हणजे अजय-अतुल ह्या आघाडीच्या आणि दिग्गज संगीतकारांच्या हातात चित्रपटाचे संगीत आहे आणि ह्या संगीतकारांचं, निर्माते म्हणून देखील , ह्या चित्रपटातून जोरदार आगमन होत आहे ! खरं तर हि सगळी नावंच चित्रपटाचा दर्जा सांगायला पुरेशी आहेत .
अजय अतुल यांच्यासह ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’या चित्रपटाची निर्मिती केलेल्या पूनम शेंडे, अनुमती, पोस्टकार्ड, हायवे चित्रपटाची निर्मिती केलेले विनय गानू, वळू आणि गाभ्रीचा पाऊस चे निर्माते प्रशांत पेठे आणि उमेश कुलकर्णी हे देखील ह्या चित्रपटाचे मराठीतले मोठे निर्माते आहेत .
खरं तर ‘चित्रपटांचं लेखन केल्यानंतर दिग्दर्शन करण्याचंही गिरिशचं स्वप्न होतं. ‘जाऊं द्या ना बाळासाहेब’ या चित्रपटामुळे ते साकार होत आहे. दिग्दर्शन करणं हे अत्यंत अवघड काम आहे. संपूर्ण जहाजाचा तो ‘कॅप्टन’ असतो. आपल्या ह्या ‘कॅप्टनचं’ खूपच क्रिएटीव दिग्दर्शन आपल्याला ह्या चित्रपटात पहायला मिळणार आहे आणि चित्रपट बघतांना सॉलिड मजा येणार हे नक्की !
ह्या चित्रपटात, सध्याची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती सुद्धा इतक्या विनोदी ढंगाने मांडून गिरीशनं खरंच कमाल केली आहे. त्याची हि कमाल आणि धम्माल पाहण्याची उत्सुकता आता चित्रपटसृष्टी बरोबरच प्रेक्षकांना देखील लागलीये ! तोपर्यंत वाट बघुयात ह्या चित्रपटाच्या निर्मितीचे सोपस्कार पूर्ण होऊन २०१६ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची!
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2016 रोजी प्रकाशित
‘जाऊंद्या ना बाळासाहेब’….. तिळगुळ घ्या आणि गोड बोला !
कोण बाळासाहेब ? का जाऊन द्या ?
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 16-01-2016 at 10:36 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaudya na balasaheb updoming marathi movie