गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी तालिबानला सत्ता स्थापन करण्यासाठी समर्थन दर्शवणाऱ्या देशांवर निशाणा साधला आहे. तथाकथित सुसंस्कृत आणि लोकशाही असलेले हे देश तालिबानसोबत हस्तांदोलन करण्यास तयार आहेत ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचं ते म्हणाले आहेत. जगातील प्रत्येक लोकशाही सरकारने तालिबानला मान्यता देण्यास नकार दिला पाहिजे, असं जावेद अख्तर म्हणाले. तसचं अफगाणिस्तानात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल तालिबानचा निषेध केला पाहिजे. असं जावेद अख्तर त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

जावेद अख्तर ट्वीटमध्ये म्हणाले, “प्रत्येक सभ्य व्यक्तीने, प्रत्येक लोकशाही सरकारने तसचं जगातील प्रत्येक सुसंस्कृत समाजाने तालिबान्यांना मान्यता देण्यास नकार द्यायला हवा. तसचं अफगाणिस्तानात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करणं गरजेचं. अन्यथा न्याय, मानवता आणि विवेक हे शब्द विसरून जा” असं म्हणत जावेद अख्तर यांनी परखड मत व्यक्त केलंय.

हे देखील वाचा: ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या, अभिनेत्रीवर अटकेची टांगती तलवार

तर आणखी एक ट्वीट करत जावेद अख्तर यांनी तालिबानचे प्रवक्ता सैयद जकीरुल्लाह यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. ट्वीटमध्ये ते म्हणाले, ” तालिबानच्या प्रवक्त्याने जगाला सांगितलंय की महिला या मंत्री बनण्यासाठी नव्हे तर घरी राहून मुलं जन्माला घालण्यासाठी असतात. मात्र तरीही जगातील तथाकथित सुसंस्कृत आणि लोकशाही देश तालिबानशी हात मिळवणी करण्यासाठी तयार आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.” असं जावेद अख्तर त्यांच्या ट्वीट मध्ये म्हणाले आहेत.

हे देखील वाचा: कतरिनासोबत साखरपुडा झाल्याच्या चर्चांवर ‘अशी’ होती विकीच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले होते…

तालिबानचे प्रवक्ता सैयद जकीरुल्लाह हाशमी यांनी महिलांबद्दल लाजिरवाणं वक्तव्य केलं होतं. सैयद यांना तालिबानच्या सरकारमध्ये महिला मंत्री का नाहित? असा सवाल विचारण्यात आला होता. यावर सय्यद यांनी ” महिलांच काम हे फक्त मुलं जन्माला घालणं आहे. त्या मंत्री बनू शकत नाही” असं उत्तर दिलं होतं.