एश्वर्या राय बच्चनच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जझबा’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रसिध्द झाला असून, चित्रपट प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारा ठरणार असल्याचे ट्रेलर पाहून जाणवते. संजय गुप्ता चित्रपटाचे दिग्दर्शक असून, चित्रपटात एश्वर्या अनुराधा वर्मा नावाची कणखर आणि प्रतिथयश संपन्न वकील म्हणून दिसणार आहे. प्रतिपक्षाला धारेवर धरत प्रत्येक न्याय-निवाडा जिंकणारी अशी तिची ख्याती दर्शविण्यात आली आहे. अशाच एका न्यायालयीन प्रकरणात अट्टल गुन्हेगाराला सोडून न दिल्यास तिच्या मुलीला मारून टाकण्याची धमकी दिली जाते तेव्हा काय होते? या भोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. दरम्यान एका निलंबीत पोलीस आधिकाऱ्याशी तिची गाठ पडते. इरफान खानने सदर आधिकाऱ्याची भूमिका वठवली असून, केवळ हा आधिकारीच तिच्यासाठी आशेचा किरण ठरतो. ‘एस्सेल व्हिजन’ची निर्मिती असलेल्या ‘जझबा’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जॅकी श्रॉफ आणि शबाना आझमीची झलकदेखील पाहायला मिळते. पाच वर्षाच्या दिर्घ काळानंतर पुनरागमन करणाऱ्या एश्वर्याला मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी चाहाते उत्सुक आहेत. या आधी ‘गुजारीश’ चित्रपटात दिसलेली एश्वर्या आराध्याच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. ९ ऑक्टोबरला ‘जझबा’ चित्रपटगृहात झळकेल.

पाहा ट्रेलर:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.