बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध गायक लभ जंजुआ हे गुरूवारी मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आले. मुंबईच्या गोरेगाव येथील बांगूर नगर परिसरात त्यांचे निवासस्थान होते. त्यांच्या या अचानक मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला आहे.


लाभ जंजुआ हे बॉलीवूडच्या अनेक प्रसिद्ध गाण्यांचे पार्श्वगायक होते. यामध्ये ‘सिंग इज किंग’मधील ‘जी करदा’, ‘रब ने बना दी जोडी’मधील ‘डान्स पे चान्स’, ‘पार्टनर’मधील ‘सोनी दे नखरे’ आणि ‘क्वीन’मधील ‘लंडन ठुमकदा’ या लोकप्रिय गाण्यांचा समावेश होता. याशिवाय, भांगडा आणि हिप-हॉप गायक आणि गीतकार म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांचा ‘मुंडिया तू बचके’ हा भांगडा अल्बम चांगलाच गाजला होता.