असंख्य संकटांवर मात करत अनेक वादळांना कवेत घेत प्रचंड जिद्दीच्या बळावर विजयी होणाऱ्या विजेत्याची कहाणी सांगणारा ‘जेता’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘जेता’चा ट्रेलर लाँच करण्यात आला असून २५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
‘संजू एन्टरटेन्मेन्ट’च्या बॅनरखाली निर्माते संजय लक्ष्मणराव यादव यांनी सहनिर्माते मिहिर संजय यादव यांच्या साथीने ‘जेता’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक योगेश साहेबराव महाजन यांनी सांभाळली आहे. संजय लक्ष्मणराव यादव यांनीच कथा लिहिली असून, योगेश सबनीस आणि योगेश साहेबराव महाजन यांच्या साथीने त्यांनी पटकथाही लिहिली आहे.

जिद्द, चिकाटी, मेहनत, त्याग, प्रेम आणि विजयाची गोष्ट या चित्रपटात आहे. याबद्दल बोलताना दिग्दर्शक योगेश महाजन म्हणाले, ‘‘आजच्या युगातील कथा सादर करताना ‘जेता’ला प्रेमकथेची गुलाबी किनारही जोडण्यात आली आहे. अर्थपूर्ण संवाद आणि कसदार अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे.’’ अभिनेता नितीश चव्हाण आणि अभिनेत्री स्नेहल देशमुख या नव्याकोऱ्या जोडीची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आकर्षित करेल, अशी भावना निर्माते संजय लक्ष्मणराव यादव यांनी व्यक्त केली. ‘जेता’चे संवादलेखन योगेश सबनीस आणि संजय लक्ष्मणराव यादव यांनी केले आहे. नितीश आणि स्नेहल या जोडीसोबत चित्रपटामध्ये शरद गोयेकर, अनिकेत केळकर, प्रज्ञा सोनावणे-डावरे, कुणाल मेश्राम, दीपक टावरे, प्रवीण इंदू, गौतम शिरसाठ, श्रेया कुलकर्णी आदी मातब्बर कलाकारही दिसणार आहेत. या चित्रपटातील गाणी कबीर शाक्य यांनी संगीतबद्ध केली आहेत. डीओपी अनिकेत के. यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, हर्षद वैती यांनी संकलन केलं आहे. साहस दृश्य शंकर पटेकर यांनी केलं असून, नृत्य दिग्दर्शकाची जबाबदारी नॉडी रसाळने सांभाळली आहे.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
albatya galbatya 3d movie coming soon vaibhav mangle play Chinchi Chetkin Role
रंगभूमी गाजवल्यानंतर रुपेरी पडद्यावर 3D मध्ये पाहायला मिळणार ‘अलबत्या गलबत्या’ चित्रपट, ‘हा’ अभिनेता दिसणार चेटकिणीच्या भूमिकेत
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!