श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करायला सज्ज झाली आहे. नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ सिनेमाचा रिमेक हिंदीमध्येही होणार आहे. स्वतः करण जोहर या सिनेमाचा रिमेक करणार आहे. या सिनेमात जान्हवी कपूर आर्चीची भूमिका बजावणार हे जवळपास निश्चितच झालं होतं. पण तिचा परश्या कोण असणार याबद्दल मात्र अजून काहीही निश्चित करण्यात आले नव्हते. पण अखेर आर्चीला तिचा परश्या भेटलाच असे म्हणावे लागले कारण करणने त्याच्या सिनेमासाठी जान्हवीसोबत शाहिद कपूरचा भाऊ इशान खत्तर याचे नाव निश्चित केले आहे.
काही दिवसांपूर्वी वरुण धवनसोबत जान्हवी सिनेसृष्टीत पदार्पण करणार अशी चर्चा होती. पण या फक्त अफवाच असल्याचे पुढे स्पष्ट झाले. पण आता डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार इशान आणि जान्हवी हे दोघं करणच्या सिनेमात दिसणार आहेत हे जवळपास पक्क झालं आहे. ‘सैराट’च्या हिंदी सिनेमाचे दिग्दर्शन शशांक खैतान करणार आहे. शशांकने ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून इशान आणि जान्हवी यांना एकत्र पाहण्यात येत होते.
प्रियांकाच्या तोकड्या कपड्यांच्या मुद्द्यावर बिग बी म्हणतात…
करण जोहरने त्याच्या बर्थडे पार्टीला संपूर्ण सिनेसृष्टीला बोलावले होते. यावेळी या पार्टीत श्रीदेवीची मुलगी जान्हवीदेखील उपस्थित होती. अनेक तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही भावी अभिनेत्री मात्र या पार्टीत एका खास व्यक्तीच्या मागे लागल्याचे पाहायला मिळाले. रणबीर कपूर याचे लक्ष वेधण्याचा ती प्रयत्न करत होती. रणबीर मात्र त्यावेळी आदित्य रॉय कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्यासोबत गप्पा मारण्यात रमला होता. दरम्यान, इशान आणि जान्हवीमध्ये प्रेमप्रकरणाच्या चर्चा सुरु असून, शाहिदने त्याच्या भावाला करिअरवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.