‘हॅरी पॉटर’चा प्रिक्वेल ‘फॅन्टास्टिक बिस्ट’मधून अभिनेता जॉनी डेपची हकालपट्टी करण्यात आली आहे. या सुपरस्टार अभिनेत्यावर त्याची घटस्फोटित पत्नी अभिनेत्री अ‍ॅम्बर हर्ड हिने कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. परिणामी वॉर्नर ब्रोसने आपल्या आगामी प्रोजेक्ट्समधून जॉनी डेपला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. परंतु या प्रकरणातील लक्षवेधी बाब म्हणजे अलिकडेच या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली होती. अन् त्यामधील केवळ एका सीनसाठी जॉनीला तब्बल ७४ कोटी २४ लाख रुपयांचं मानधन देण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – ‘नग्नता हा गुन्हा असेल तर नागा साधूंना अटक करा’; अभिनेत्रीचा मिलिंद सोमणला पाठिंबा

जॉनी डेप हा खऱ्या अर्थाने एक सुपरस्टार अभिनेता आहे. तो कुठलाही चित्रपट स्विकारताना त्यामध्ये त्याचे सीन किती आहेत? यांचा विचार करुन पैसे घेतो. ‘फॅन्टास्टिक बिस्ट’ प्रोजेक्टमध्ये वॉर्नर ब्रोस या निर्मिती संस्थेने कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. खरं पाहिलं तर ही संपूर्ण चित्रपट मालिका गॅलिअर्ट ग्रिंडलवर्ड ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जॉनी डेपभोवती फिरते. त्यामुळे निर्मात्यांनी त्याला एका सीनसाठी १० मिलिअन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास ७४ कोटी २४ लाख रुपये दिले होते. परंतु अ‍ॅम्बर हर्डच्या आरोपांमुळे त्याला चित्रपटातून बाहेर काढण्यात आलं आहे.

अवश्य पाहा – नखरे करणं अभिनेत्रीला पडलं भारी; १८ व्या दिवशी मालिकेतून काढून टाकलं

जॉनीला ‘फॅन्टास्टिक बिस्ट’मधून काढल्यामुळे चाहते प्रचंड नाराज आहेत. यापूर्वी त्याला डिस्ने स्टुडिओने ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ या चित्रपट मालिकेतून काढलं होतं. निर्मात्यांच्या निर्णयामुळे नाराज झालेले चाहते थेट या फ्रेंचाईजीवर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर चित्रपटाचा प्रोजेक्टचा आता लांबणीवर टाकण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Johnny depp fantastic beasts franchise usd 10 million for shooting just one scene mppg
First published on: 11-11-2020 at 13:56 IST