पायरेट्स ऑफ द कॅरेबियन चित्रपट अभिनेता जॉनी डेप त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पूर्वाश्रमीची पत्नी एम्बर हर्डच्या विरोधात जॉनीने पुन्हा एकदा कोर्टात मानहानीचा अर्ज दाखल केल्याने ते दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जॉनी डेप आणि एम्बर हर्डचा सुरु असलेला मानहानीचा खटला जॉनी डेपने जिंकला आहे. त्यामुळे आता एम्बर हर्डला जॉनी डेपला १५ मिलियन डॉलर म्हणजे ११६ कोटी द्यावे लागणार आहे. सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने याबाबतचा निकाल दिला आहे. या निकालानंतर जॉनीने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या या निकालानंतर जॉनी डेपच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जॉनी डेपचे अनेक चाहते हे मोठ्या संख्येने कोर्टाबाहेर जमा झाले आहेत. अनेकांनी या निकालानंतर सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना जॉनी डेप म्हणाला, “सहा वर्षांपूर्वी माझे आयुष्य, माझ्या मुलांचे आयुष्य, माझ्या जवळच्या लोकांचे जीवन आणि अनेक वर्षांपासून मला पाठिंबा देणाऱ्या आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे जीवन डोळे मिटताच कायमचे बदलले.”

Johnny Depp Vs Amber Heard: जॉनी डेपच्या बाजूने कोर्टाचा निकाल, एंबर देणार ११६ कोटींची भरपाई

जॉनी डेप नेमकं काय म्हणाला?

“माझ्यावर अत्यंत गंभीर, खोटे आणि गुन्हेगारी पद्धतीचे आरोप लावण्यात आल्याची माहिती मीडियामध्ये पसरली. यामुळे माझ्याविरुद्ध द्वेषपूर्ण मजकूर छापण्यात आले. माझ्यावर लावलेले अनेक आरोप पाहून मला धक्का बसला होता. यामुळे माझ्या आयुष्यावर आणि माझ्या करिअरवर परिणाम झाला. पण आता तब्बल सहा वर्षांनी ज्युरीने मला माझे जीवन परत दिले आहे. मी त्यांचे खरोखर आभारी आहे.

या आरोपानंतर मला अनेक कायदेशीर अडथळ्यांना सामोरे जावे लागणार होते. मात्र माझ्या जीवनातील काही ठराविक गोष्टींचा जगभरात तमाशा सुरु आहे, याचा विचार करुनच मी या खटल्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. ज्युरी काय निकाल देतील याची पर्वा न करता सत्य समोर आणणे हेच माझे ध्येय होते. पण आता ज्युरीने दिलेल्या निकालानंतर सत्य समोर आले आहे. मी शेवटी ते पूर्ण केल्याने मला आता शांत वाटत आहे.

मला या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःचा वेळ दिल्याबद्दल फार आभार. मला सत्य उघड करण्यास मदत केल्याबद्दल अथक मेहनत करणाऱ्या वकिलांचे आभार. अजून सर्वोत्तम गोष्टी येणे बाकी आहे. पण तरीही शेवटी एक नवा अध्याय सुरु झाला आहे”, असे जॉनी डेपने म्हटले.

विश्लेषण : मस्कसोबत शारीरिक संबधापासून बोट कापण्यापर्यंत; जॉनी डेप-एम्बर हर्डचे खळबळजनक खुलासे, जाणून घ्या संपूर्ण वाद

अशी झाली वादाची सुरुवात

घटस्फोटानंतर एम्बर हर्डने दावा केला होता की जॉनी डेप दारूच्या नशेत तिला मारहाण करायचा. मात्र जॉनी डेपने हे आरोप फेटाळून लावले. २०१८ मध्ये एम्बर हर्डने मध्ये वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक ओपिनियन पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने स्वत:ला घरगुती हिंसाचारातून वाचलेले असल्याचे सांगितले. हर्डने त्यात जॉनी डेपचे नाव घेतले नाही, पण ती त्याच्याकडे बोट दाखवत असल्याचे दिसून आले. जॉनी डेपलाही याची जाणीव झाली आणि त्यांनी एम्बर हर्डवर मानहानीचा खटला दाखल केला.

जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांच्यातील हायप्रोफाइल कायदेशीर लढाईदरम्यान गेल्या सहा आठवड्यांपासून अनेक साक्षीदारांचे जबाब ज्यूरीसमोर नोंदवले गेले. गेल्या सहा आठवड्यात शंभरहून अधिक तास साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात होते. दीर्घ साक्ष आणि वादविवाद झाल्यानंतर अखेर मानहानीचा खटला जॉनी डेपने जिंकला आहे. त्यामुळे आता एम्बर हर्डला जॉनी डेपला १५ मिलियन डॉलर म्हणजे ११६ कोटी द्यावे लागणार आहे. सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने याबाबतचा निकाल दिला आहे. याप्रकरणी प्रदीर्घ चर्चा, साक्ष, आणि अनेक पुरावाच्या विचार विनमयानंतर या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली.