चित्रपटक्षेत्रात आपल्या आई किंवा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा वारसा फार पूर्वीपासून चालत आला आहे.आता हाच कित्ता गिरवत जॉनी लिव्हरची मुलगी जेमी लिव्हर हिनेही विनोदी मालिकेतून मनोरंजनाच्या दुनियेत पदार्पण केले आहे.
सोनी चॅनेलवरील कॉमेडी सर्कस के महाबलीमधून तिने श्रीगणेशा केलेला आहे. पदार्पणातच तिने विनोदीबुद्धीची चुणूक दाखवून दिली. या कार्यक्रमात तिच्यासोबत प्रसिद्ध विनोदी अभिनेता सुरेश मेनन आणि मुबीन हे कलाकार आहेत. या कार्यक्रमामध्ये जेमी तीन पात्र वठवित असून, या पात्रांना तिने पूर्णपणे न्याय दिलेला आहे, असे मत परीक्षक विवेक ओबेरॉय याने व्यक्त केले.
जेमी या संदर्भात बोलताना म्हणते, मला विनोद कळतो तो केवळ माझ्या वडिलांमुळेच. वडिलांना लहानपणापासून स्टेज शो करताना पाहात आलेय. आपणही त्यांच्यासारखेच काहीतरी करायला हवे असे सतत वाटत होते, म्हणूनच मी या क्षेत्रात प्रवेश केला, असे तिने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Johny lever daughter in comedy serial
First published on: 20-08-2013 at 09:46 IST