‘मॅड मेन’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेला अभिनेता जॉन हॅम हा आपले पोशाख, केशरचना आणि प्रेक्षकांना आकर्षित करणारी जीवनशैली यामुळे नेहमीच चच्रेत असतो. सध्या जॉन ‘बेबी ड्रायव्हर’ या चित्रपटातील हटके लुक्समुळे चच्रेत आहे. एडगर राइट दिग्दर्शित या चित्रपटात जॉन ‘बट्टी’ नामक व्यक्तिरेखा साकारणार आहे. हा बट्टी बँकेत दरोडे घालणारा एक सराईत गुन्हेगार आहे. दरम्यान, तो ‘बेबी’च्या प्रेमात पडतो आणि त्यानंतर दोघांच्या एकत्र येण्यासाठीचा संघर्ष सुरू होतो. असा हा एक संगीत प्रणय चित्रपट आहे. जॉनने आतापर्यंत ‘टेड’, ‘बेन’, ‘मायकल ग्रॅनर’ यांसारख्या अनेक लोकप्रिय व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. परंतु बट्टी या भूमिकेबाबत तो कमालीचा उत्साही आहे. त्याच्या मते प्रत्येक कलाकार आपल्या आयुष्यभर आव्हानात्मक भूमिकेच्या शोधात असतो. ‘बेबी ड्रायव्हर’ हा चित्रपट त्याचा तो शोध पूर्ण करेल अशी त्याची अपेक्षा आहे. एडगर राइटसुद्धा या चित्रपटाबाबत कमालीचा आशावादी आहे. त्याच्या मते प्रेक्षकांनी दृश्यमाध्यमांतून अनेक यशस्वी व्यक्तिरेखा पाहिल्या आहेत. त्यांच्या यशामागे त्या कलाकारांची आणि दिग्दर्शकांची मेहनत होती. परंतु एखादे व्यक्तिचित्र प्रेक्षकांच्या मनावर िबबवायचे असेल तर उत्तम संगीत आणि वेशभूषा यांची आवश्यकता असते. आणि या चारही बाबींचे योग्य मिश्रण झाले तर ‘स्पाइडरमॅन’, ‘जॅक स्पॅरो’, ‘विली वोंका’, ‘द मॅड हॅटर’, ‘आयर्नमॅन’ यांसारख्या प्रेक्षकांना अचंबित करणाऱ्या व्यक्तिरेखा जन्माला येतात. ‘बेबी ड्रायव्हर’मधून जॉनची व्यक्तिरेखा अशीच दबदबा निर्माण करेल, या चित्रपटातील कलाकारांचे वेगळे लुक्स आणि जोडीला अप्रतिम संगीत यांची योग्य भट्टी जमली तर ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरता येईल, अशी मनीषा राईट बाळगून आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jun 2017 रोजी प्रकाशित
जॉन हॅम नवीन रंगात, नवीन ढंगात
एडगर राइट दिग्दर्शित या चित्रपटात जॉन ‘बट्टी’ नामक व्यक्तिरेखा साकारणार आहे.
Written by मंदार गुरव
Updated:

First published on: 18-06-2017 at 00:31 IST
TOPICSमंदार गुरव
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jon hamm look baby driver movie mad men movie hollywood katta part