बॉलीवूड शेहनशहा अमिताभ बच्चन हे नेहमीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांचे चाहते आता केवळ एका मिस्ड कॉलने संपर्क साधू शकणार आहे. या मिस्ड कॉलचे उत्तर बिग बी एसएमएसद्वारे देणार आहेत. अमिताभ यांना केला जाणारा हा मिस्ड कॉल आणि त्यानंतर येणारे हे ट्विट मोफत असणार आहे. ०२२-३३०१००००७ या क्रमांकावर कॉल केल्यानंतर दुसऱ्याच क्षणाला मोबाईलवर अमिताभ यांचा संदेश व लागलीच त्यांनी केलेले ट्‌विट एसएमएसमध्ये येतो. बच्चन यांनी चाहत्यांसाठी योजिलेल्या या संकल्पनेला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्यांनी केलेले ट्विट हे या एसएमएसद्वारे थेट दिसू शकणार आहे. पल्या चाहत्यांशी कनेक्ट होण्यासाठी अमिताभ यांनी हा नवा फंडा शोधला आहे.