बॉलिवूड अभिनेत्री काजोल Kajol वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. काजोलने रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यात तिने बीफ पार्टी केल्याचे सांगितलंय.

काजोल मित्रमंडळींसह लंचसाठी तिच्या मित्राच्या घरी गेली होती. त्यावेळी तिने फेसबुकवरून लाइव्ह व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तिने मित्र रेयानने लंचमध्ये काही खास मेन्यू बनवल्याचे सांगितले. तसेच, या मेन्यूची झलकही तिने व्हिडिओत दाखवली. रेयानने बाउलमध्ये रश्यासारखा पदार्थ ओतल्यावर काजोल आणि तिच्या मैत्रिणी उत्साहित होऊन ओरडत होत्या. त्यानंतर कॅमेऱ्याची स्क्रिन स्वतःकडे फिरवत ही कोणती डीश आहे ते सगळ्यांना सांग असे तिने आपल्या मित्राला सांगितले. तिच्या या प्रश्नावर रेयानने जे उत्तर दिलेय त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर अधिकाधिक व्हायरल होतोय. तिच्या या व्हिडिओवर नेटिझन्स त्यांच्यापरीने विविध प्रतिक्रिया देत आहेत. जेव्हा काजोलने डीशचे नाव विचारले तेव्हा तिच्या मित्राने ते बीफ असल्याचे सांगितले. ते ऐकताना काजोल खूप उत्साही दिसत होती. चला, आता मी जाते….. मला या डीशचा स्वाद घ्यायचा आहे, असे व्हिडिओच्या शेवटी काजोलने म्हटले.

सध्या देशभरात बीफवरून बरेच वाद होत आहेत. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून महंमद अखलाख सैफी या ५२ वर्षीय व्यक्तीचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. राजधानी दिल्लीपासून फक्त पन्नास किलोमीटरच्या अंतरावर २८ सप्टेंबर २०१५ च्या रात्री घडलेल्या त्या घटनेने सारा देश हादरला होता. बीफ प्रकरणावर लोक मौन बाळगणे पसंत करत असतानाच काजोलने मात्र उघडपणे व्हिडिओ शेअर केला. नेटिझन्स तिचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. अनेक युजर्सने या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या असून ‘देशप्रेमी हिरो अजय देवगणची पत्नी काजोल बीफ खाताना दिसतेय’, असेही लिहिलंय. तसेच, बीफ खाणारी काजोलही देशद्रोही आहे का? असा सवालही काही युजर्सनी केला आहे. सोशल मीडियावर होत असलेला वाद पाहता काजोलना तो व्हिडिओ हटवला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

kajol-1

kajol-2

kajol-3

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

kajol-4