बॉलीवूड अभिनेत्री कल्की कोचलीन चित्रपटांतील तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. मात्र, आता एका वेगळ्या कारणासाठी कल्कीचे नाव प्रकाशझोतात आले आहे. बालवयात आपले लैंगिक शोषण झाले असल्याची धक्कादायक कबुली कल्की कोचलीन हिने दिली. लहान मुलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी कार्यरत असणा-या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमात कल्कीने बालपणी तिला आलेल्या भयानक अनुभवाबद्दल उपस्थितांना सांगितले. माझ्या आयुष्यातील घटनेविषयी मला तुम्हाला सांगायचे आहे असे कल्कीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले. बालवयात मला लैंगिक शोषणासारख्या भयानक अनुभवाला सामोरे जावे लागले. माझ्या ओळखीतील अनेकजण बालवयात लैंगिक शोषणाच्या अनुभवाला सामोरे गेले असल्याचे कल्कीने सांगितले. एरवी आपल्या भुतकाळातील वाईट प्रसंगांची वाच्यता न करणा-याविषयी बॉलीवूड तारका अतिशय सजग असताता. मात्र, कल्की कोचलीनने लहान मुलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी जाहिररित्या तिला आलेल्या अनुभवाची कबुली दिली आहे. आपण दिलेल्या या कबुलीमुळे याप्रकारचा अनुभव आलेले इतर अनेकजण त्यांचे अनुभव आणि या सगळ्यातून त्यांनी काढलेला मार्ग याविषयी खुलेपणाने चर्चा करतील असा आशावाद कल्की कोचलीनने व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2014 रोजी प्रकाशित
बालवयात लैंगिक शोषण झाले असल्याचा कल्की कोचलीनचा गौफ्यस्फोट
बॉलीवूड अभिनेत्री कल्की कोचलीन चित्रपटांतील तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. मात्र, आता एका वेगळ्या कारणासाठी कल्कीचे नाव प्रकाशझोतात आले आहे.
First published on: 08-04-2014 at 02:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalki koechlin i was sexually abused as a child