भारतीय क्रिकेटपटू हरजभजन सिंग याच्या घरी २७ जुलैला छोट्या परीचे आगमन झाले. त्याची पत्नी आणि अभिनेत्री गीता बसरा हिने गोंडस मुलीला जन्म दिला. हरभजन आणि गीताच्या या आनंदात सहभागी होत सर्वांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. पण इतरांवर नेहमी टीका करण्यसाठी किंवा खिल्ली उडवण्यासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता कमार आर खान याने विचित्र ट्विट केले . भज्जीन खूप चांगली प्लॅनिंग केली. लग्नाच्या बरोबर नऊ महिन्यांनंतर तो बाबा झाला आहे. कमाल आधीच त्याच्या ट्विट्समुळे प्रसिद्ध आणि बदनामही आहे.
कमाल आर खानने ट्विटमध्ये लिहलेले की, हरभजन सिंगने गेल्या वर्षी २९ ऑक्टोबरला लग्न केले होते. त्याच्या घरी २८ जुलै २०१६ साली मुलीने जन्म घेतला. बरोबर नऊ महिन्यांनंतर, याला म्हणतात खरी प्लॅनिंग. कमालच्या या ट्विटवर हरभजनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्याच्या या ट्विटवर अनेक लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. त्याने एखाद्या सेलिब्रेटीची खिल्ली उडवण्याची ही काही पहिली वेळ नाही. त्याने याआधी नर्गिस फाख्री, सनी लिओनी, करिष्मा तन्ना यांच्यासंबंधी विवादास्पद ट्विट केले होते. इतकेच नाही तर आलिया भटच्या बिकनी फोटोवर त्याने केलेल्या ट्विटमुळे बराच वाद झाला होता.
दरम्यान, कमाल खानविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात रिझवान सिद्धीकी या वकिलाने नुकतीच तक्रार दाखल करण्यात आली. याबाबतची अधिकृत माहिती ‘एनआय’ या वृत्तसंस्थेने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. ट्विटरवरुन अभिनेत्री आणि मॉडेल्सबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह प्रतिक्रिया देणाऱ्या कमाल खान विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘ऑफिसमध्ये काम करतेवेळी मी कमाल खान यांचे ट्विट पाहिले. त्या ट्विटमध्ये त्यांनी एका अश्लील फोटोसह काही आक्षेपार्ह प्रतिक्रिया पोस्ट केल्या होत्या’ असे तक्रार दाखल करणाऱ्या रिझवान सिद्धीकी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamaal r khan makes fun of harbhajan singh
First published on: 31-07-2016 at 12:42 IST