शब्बीर अहलुवालिया-कांची कौरला दुस-यांदा पुत्ररत्न

शब्बीर आणि कांचीला अझय हा दीड वर्षांचा मुलगा आहे.

टीव्ही कलाकार शब्बीर अहलुवालिया आणि कांची कौर यांना दुस-यांदा पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. ‘कही तो होगा’, ‘काव्यांजली’, ‘कुमकुम भाग्य’ या मालिकांसाठी नावाजलेला अभिनेता शब्बीरने ट्विटरवरून आपल्याला दुस-यांदा मुलगा झाल्याचे सांगत आनंद जाहीर केला.
२०११ साली विवाहबंधनात अडकलेल्या शब्बीर आणि कांचीला अझय हा दीड वर्षांचा मुलगा आहे. गेल्याच आठवड्यात अर्पिता खानचा ओटभरणी कार्यक्रम झाला. त्यावेळी कांची, जेनेलिया आणि अर्पिता या तिघींनीही कॅमे-यास पोज दिली होती. त्यावेळी या तिघींच्याही चेह-यावर मातृत्वाच्या चाहूलीमुळे तेज आले होते.
दरम्यान, शब्बीरने आपल्या दुस-या बाळाची बातमी देताच बॉलीवूड आणि टीव्ही कलाकारांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kanchi kaulshabbir ahluwalia