बॉलिवूडची ‘क्वीन’ झाली भावूक..

चित्रपटाचे स्क्रिनिंग संपल्यानंतर कंगनाने ‘पिंक’ चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची व्यक्तिगतपणे स्तुती केली आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ‘पिंक’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. तीन मुलींच्या भोवती या चित्रपटाचे कथानक फिरणार असून बिग बी यात एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरने रसिकांच्या मनावर यापूर्वीच छाप उमटवली आहे. अभिनेत्री कंगना रणौत हिने नुकताच ‘पिंक’ हा चित्रपट पाहिला. बॉलिवूडच्या क्वीनला हा चित्रपट इतका आवडला की चित्रपट पाहताच ती फार भावूक झाली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
‘पिंक’ या चित्रपटाचे नुकतेच एक खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. काही खास व्यक्तिंसाठी ठेवण्यात आलेल्या या स्क्रिनिंगला आभिनेत्री कंगना रणौतनेही हजेरी लावली होती. दरम्यान चित्रपट सुरु असताना कंगना फारच भावूक झाली होती. चित्रपट सुरु असताना तिने तिच्या भावनानंना आवर घातला होता. पण, चित्रपट संपताच तिच्या भावनांचा बांध फुटला आणि तिला रडू आले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत इतर कोणालाही माहिती होता कामा नये यासाठी कंगना थेट प्रसाधनगृहामध्ये गेली. चित्रपटाचे स्क्रिनिंग संपल्यानंतर कंगनाने ‘पिंक’ चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची व्यक्तिगतपणे स्तुती केली आहे.
कंगनाने तिच्या जीवनातही अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिलेले आहे. त्यामुळे तिला या चित्रपटाचे कथानक अधिक जवळचे वाटले. कंगना व्यतिरिक्तही इतर कलाकारांनीसुद्धा ट्विटरद्वारे ‘पिंक’ या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. ज्युनिअर बच्चन अभिषेकनेसुद्धा या चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर ट्विटरवर ‘आपण नि:शब्द झालो आहोत, बऱ्याच काळानंतर असा चित्रपट पाहण्याची संधी मिळाली आहे’, असे लिहिले होते.
सध्या सिनेवर्तुळात ‘पिेंक’ चित्रपटाची प्रचंड चर्चा असून तितकीच उत्सुकताही पाहावयास मिळते आहे. ‘पिंक’ या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीमध्ये झाले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने रसिकांच्या मनावर यापूर्वीच छाप उमटवली आहे. शूजित सरकार या चित्रपटाची निर्मिती करणार असून याआधी त्यांनी अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘पिकु’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ‘पिंक’ या चित्रपटाद्वारे बंगाली चित्रपट दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. १६ सप्टेंबरला अमिताभ यांचा ‘पिंक’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kangana ranaut cries after watching pink

ताज्या बातम्या