भाईचारा! भावंडांसाठी कंगनाचं खास गिफ्ट; खरेदी केले इतक्या कोटींचे ४ फ्लॅट

हे फ्लॅट चंदीगड येथे खरेदी केले आहेत

वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. ती सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. दरम्यान कंगनाने चंदीगडमध्ये चार नवे फ्लॅट खरेदी केले असून हे फ्लॅट बहिण रंगोली चंडेल आणि भाऊ अक्षतला भेट म्हणून दिले आहेत.

इ-टाइम्सला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंगनाने हे फ्लॅट चार कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. ‘कंगनाने प्रत्येक वेळी तिच्या बहिण भावांना पाठिंबा दिला आहे. यावेळी तिने चंदीगडमधील पॉश भागामध्ये फ्लॅट खरेदी केले असून त्यांना भेट म्हणून दिले आहेत. हे फ्लॅट विमानतळाजवळ आहेत. तसेच चंदीगडमधील सर्वात पॉश भागामध्ये आहेत’ अशी माहिती सूत्रांनी इ-टाइम्सला दिली आहे. कंगना सतत तिच्या भावंडांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत करत असते असे देखील पुढे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bombay Times (@bombaytimes)

आणखी वाचा- निक्की तंबोळीसाठी बिग बॉसमध्ये होणार पुन्हा जानची एण्ट्री?

लवकरच कंगना देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या चरित्र चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. कंगणाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती. ‘थलाइवी’नंतर कंगनाचा हा दुसरा राजकीय चित्रपट असणार आहे. इंदिरा गांधी यांच्यावर आधारित चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. हा सिनेमा एका पुस्तकावर आधारित असणार आहे. इंदिरा गांधी यांच्या काळातील आणीबाणी आणि ऑपरेशन ब्लूस्टार हे दोन मोठ्या निर्णयही या सिनेमात दाखवले जाणार आहेत. या चित्रपटाचे कथानक साई कबीर यांनी लिहिलेले आहे. शिवाय चित्रपटाचे दिग्दर्शनही साई कबीरच करणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kangana ranaut gifts 4 flats to rangoli chandel and other cousins avb

ताज्या बातम्या