कुणाल कामरा-संजय राऊत यांच्यातील ‘जेसीबी’ भेटीवरून कंगना संतापली; म्हणाली,…

‘यातून महाराष्ट्र सरकारची अकार्यक्षमता आणि…’; कंगना संतापली

सध्या सोशल मीडियावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या पॉडकास्ट शूटची चर्चा रंगली आहे. कुणालच्या ‘शट अप या कुणाल’ या पॉडकास्टमध्ये कुणालने राऊतांना जेसीबी भेट दिल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. मात्र, यावर अभिनेत्री कंगना रणौतने नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच संजय राऊत आणि कुणाल कामरा यांच्यावर निशाणादेखील साधला आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. जेसीबी लावून हे बांधकाम पाडण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर कुणाल कामराने राऊतांना जेसीबी भेट दिल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यावर कंगनाने आगपाखड केली आहे.


“भलेही मला प्रचंड मोठा मानसिक त्रास देण्यात आला. भावनिक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या माझं खच्चीकरण करण्यात आलं. पण यातून महाराष्ट्र सरकार आणि त्याची अकार्यक्षमता व राजकीय डावपेच दिसून आला. त्यांच्या भोळेपणावरील पडदा दूर होताना दिसतोय. माझ्या घरावरील अवैध बांधकाम म्हणत केलेल्या कारवाईची अशी चेष्टा? यावरुनच सगळं स्पष्ट होतंय”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.

आणखी वाचा- कुणाल कामराने संजय राऊत यांना भेट दिला ‘JCB’

दरम्यान, कंगनाची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे. अलिकडेच कुणाल कामराने त्याच्या ‘शट अप या कुणाल’ या पॉडकास्टची सुरुवात केली. या पॉडकास्टची सुरूवात संजय राऊत यांच्या मुलाखतीनं करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती. कुणालची ही इच्छा संजय राऊत यांनी पूर्ण केली. कुणाल कामराने या पॉडकास्ट शूटचा फोटो त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. आतापर्यंतचे सर्वोत्तम पॉडकास्ट शूट असा संदेशही त्याने लिहिला आहे. मात्र, या फोटोमध्ये त्याने संजय राऊत यांना भेट दिलेल्या जेसीबीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kangana ranaut slam kunal kamra and sanjay raut this picture getting reaction ssj

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या