scorecardresearch

‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘तो’ परतणार

‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणा-या सेलिब्रिटी पाहुण्यांनी कपिलला त्याचे मत बदलण्यास भाग पाडले आहे.

loksatta, marathi news paper, news paper, news online, marathi news, marathi news online, newspaper, news, latest news in marathi, current news in marathi,sport news in marathi, bollywood news in marathi
मंत्री पद आणि शुटिंग हे दोन्ही मी सांभाळू शकतो असे सिद्धूने म्हटले आहे.

अभिनेता, विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा शो’मधील सर्वच पात्रांना आजवर प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. या शोमधील राजेश अरोरा या पात्रास प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. पण, काही काळानंतर कपिलने हे पात्र साकारणे बंद केले होते. मात्र, ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणा-या सेलिब्रिटी पाहुण्यांनी कपिलला त्याचे मत बदलण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे लवकरच राजेश अरोरा हे पात्र पुन्हा एकदा लोकांचे मनोरंजन करताना दिसेल.

‘मी पहिल्यांदा राजेश अरोरा हे पात्र साकारले होते तेव्हा याला इतकी पसंती मिळेस असा विचारही माझ्या मनात आला नव्हता. आम्ही काही एपिसोड केले आणि त्यानंतर ते पात्र पुन्हा कधी आलेच नाही. पण, या शोमध्ये येणा-या सेलिब्रिटी पाहुण्यांनी अचानक या पात्राविषयी मला विचारण्यास सुरुवात केली. तसेच, सोशल मिडीयावरही चाहत्यांकडून या पात्रास परत आणण्याची मागणी करण्यात येतेय,’ असे कपिल शर्मा म्हणाला. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री नीतू कपूर या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये उपस्थित राहिल्या होत्या. त्यांनी देखील हाच प्रश्न कपिलसमोर उपस्थित केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रीकरणाच्या दरम्यानच नीतू यांनी राजेशचे पात्र सध्या कार्यक्रमात दिसत नाही, असे कपिलला म्हटले. शोमध्ये काहीतरी नवीन दाखविण्यासाठी कपिलने सदर पात्र साकारणे बंद केले होते. पण, आता हे पात्र पुन्हा शोमध्ये आणण्याचा त्याने निर्धार केला आहे. राजेश अरोरा हे पात्र शोमध्ये परत आणण्याविषयी कपिल म्हणाला की, या पात्राचे पुनरागनम खूप मजेदार असणार आहे. काही दिवसांच्या सुट्टीनंतर आता तो परत येतोय आणि तो पूर्वीपेक्षाही अधिक खट्याळ असणार आहे.

_5087e134-f43f-11e6-bee8-7b74d3637aa8

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अक्षयने त्याच्या ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी द कपिल शर्मा शोच्या सेटवर हजेरी लावली होती. कपिल शर्मा शोच्या सेटवर त्याने खूप मस्ती केली. त्याने सेटवरचे काही फोटोही ट्विट केले होते. अक्षय कुमारसाठी न्यायालयाचा सेट उभा करण्यात आला होता. या न्यायालयात अक्षयने, कपिल शर्मालाच चौकशीसाठी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यानंतर अॅक्शनचा बादशहा जॅकी चॅन आणि अभिनेता सोनू सूद यांनी देखील त्यांच्या ‘कुंग फू योगा’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कपिलच्या शोवर हजेरी लावली होती.  यावेळी जॅकी चॅन आणि सोनू सूद यांच्या येण्याने सर्वांच्याच चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. कार्यक्रमासाठी आलेल्या या पाहुण्यांचे आपल्या विनोदी आतषबाजीने स्वागत करत कपिल शर्माने चांगलीच खेळी केली होती. विनोदवीर कपिल शर्मा आणि त्याची संपूर्ण टीम येणाऱ्या पाहुण्यांना खळखळून हसवते हे तर सारे जाणतातच. पण, यावेळी मात्र प्रसिद्ध अभिनेते जॅकी चॅन यांना कपिलच्या या टीमने मराठमोळ्या झिंगाट या गाण्यावर थिरकायला भाग पाडले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-02-2017 at 16:34 IST