बिग बॉस ओटीटीच्या यंदाच्या वीकेंड एपिसोडमध्ये दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी अनेक स्पर्धक भावूक होताना दिसून आले. सिद्धार्थ शुक्ला हा बिग बॉस १३ चा विजेता ठरला होता आणि नुकतंच त्याचं हार्टअटॅकने निधन झालं. त्याच्या निधनानंतर बिग बॉस ओटीटीमध्ये त्याला ट्रिब्यूट देण्यात आलं. त्यानंतर करण जोहरने घरातील सदस्यांसोबत बातचीत सुरू केली आणि जनतेचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवले. यंदाच्या एपिसोडमध्ये मिलिंद गाबा एलिमिनेट झाला. पण करण जोहरने यापेक्षाही जास्त मोठं सरप्राईज दिलं. यंदाच्या एलिमिनेशनमध्ये केवळ सदस्यच नाही तर त्याच्यासोबत त्याचं कनेक्शन देखील बेघर झाले.
भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह झाली बेघर
होय, बिग बॉस ओटीटीमधून केवळ मिलिंद गाबाच नव्हे तर त्याच्यासोबत त्याचं कनेक्शन अक्षरा सिंह सुद्धा बेघर झाली. जनतेचा हा निर्णय ऐकून घरातील इतर सदस्यांना सुद्धा मोठा धक्का बसला. एका दिवसात दोन एलिमिनेशन झालेले पाहून ते सुद्धा थोड्या प्रमाणात नाराज झाले. अक्षरा सिंह घराबाहेर पडताना खूपच भावूक झालेली दिसून आली. घराबाहेर जाता जाता तिने नेहा भसीनला सॉरी म्हटलं. नेहाने सुद्धा तिची गळाभेट घेतली. यावेळी अक्षरा सिंह तिला म्हणाली, “मला जितकं समजलं तितकं मी या शोमध्ये खेळले, काही गोष्टी कदाचित मला समजल्या नसतील.”
शोमध्ये पोहोचले रोनित-ऋचा
या शोमध्ये रोनित रॉय आणि ऋचा चड्ढा यांनी प्रवेश केलाय. या दोघांनी स्पर्धकांनी वेगवेगळे गेम्स खेळले आणि स्पर्धकांमधल्या बॉण्डिंगची परिक्षा घेतली. सोबतच रुबीना बिग बॉस १४ ची ट्रॉफी घेऊन आली होती. घरातील सदस्यांना या ट्रॉफीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी ती ही ट्रॉफी घेऊन आल्याचं सांगितलं. दुसरीकडे निक्की तांबोळीने प्रतीकवर असलेलं प्रेम व्यक्त केलं. दोघांनी एकमेकांना किस सुद्धा केलं.
View this post on Instagram
दिव्याचं दुःख झळकलं
बिग बॉस ओटीटीच्या सुरूवातीच्या वीकेंड एपिसोडमध्ये दिव्याने करण जोहरकडे आपलं दुःख व्यक्त केलं होतं. या घरात कोणत्याही कनेक्शनशिवाय खेळणं हे तिच्यासाठी किती अवघड जात आहे, हे तिने सांगितलं. घरातील इतर सदस्यांमध्ये जाऊन खेळणं याच्याशिवाय तिच्याकडे पर्याय नसल्याचं देखील तिने सांगितलं होतं.
बिग बॉस ओटीटीबद्दल सांगायचं झालं तर या शोसाठीचे केवळ दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत. या घरात आता केवळ मूस जट्टाना, निशांत भट्ट, दिव्या अग्रवाल, शमिता शेट्टी, नेहा भसीन, राकेश बापट आणि प्रतीक सहजपाल हे स्पर्धक राहिले आहेत.