“सैफ आणि तू दुसऱ्यांदा गोड बातमी कधी देणार?”, करिना कपूर म्हणते…

‘गुड न्यूज’ चित्रपटानिमित्त करिनाला विचारण्यात आला प्रश्न

सैफ अली खान आणि करिना कपूर

बॉलिवूडमधील सतत चर्चेत असणारी जोडी म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर. अगदी चित्रपटांच्या प्रमोशपासून ते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यापर्यंत अनेक बातम्यांसाठी हे दोघेही कायमच चर्चेत असतात. करिना कपूर सध्या आपल्या गुड न्यूज या चित्रपटाच्या कामामध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे सैफही त्याच्या आगामी चित्रपटांच्या कामामध्ये आहे. असं असतानाही हे दोघे आपला मुलगा तैमुरसाठी आवर्जून वेळ देताना दिसत आहेत. या तिघांचे अनेक फोटो वेळोवेळी व्हायरल होताना दिसतात. अनेकदा मुलाखतींमध्ये करिनाला दुसऱ्यांदा गोड बातमी कधी अशासंदर्भातील प्रश्न विचारले जातात. असाच एक प्रश्न तिला नुकताच मुलाखतीमध्ये विचारण्यात आला.

‘नवभारत टाइम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये गुड न्यूज चित्रपटाच्या संदर्भात चर्चा सुरु असतानाच करिनाला खऱ्या आयुष्यात दुसऱ्यांदा काही आनंदाची बातमी देण्याचा विचार आहे का अशा अर्थाचा एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला करिनाने “सैफ आणि मी सध्या दुसऱ्या बाळाचा विचार केलेला नाही. आम्ही सध्या तैमुरबरोबर खूप आनंदात आहोत,” असं उत्तर दिलं. “आम्ही दोघेही सध्या कामामध्ये प्रचंड व्यस्त आहोत. प्रोफेश्नल तसेच पर्सनल आयुष्यातही सध्या खूप घडामोडी सुरु आहेत. त्यामुळेच सध्या आमच्याकडून कोणत्याही आनंदाच्या बातमीची अपेक्षा ठेऊ नका,” असं करिनाने उत्तर देताना म्हटलं आहे.

“दुसऱ्या मुलासंदर्भातील आनंदाची बातमी सध्या आमच्याकडून नाही. आम्ही तैमुरबरोबर खूप आनंदात आहोत. आम्ही सध्या आमचे काम आणि तैमुरला अधिक वेळ देण्याच्या प्रयत्नात आहोत,” असं करिनाने पुढे बोलताना स्पष्ट केलं.

सध्या करिना ‘गुड न्यूज’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. करिना या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये ती एका गर्भवतीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचं प्रमोशन सुरु आहे. त्यामुळेच तिला अनेकदा तैमुरबद्दल आणि गरोदर असतानाच्या आठवणींबद्दल प्रश्न विचारले जात आहे. करिनासोबतच या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ, कियारा आडवाणी, जिमी शेरगिल, अंजना सुखमानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. २७ डिसेंबर रोजी ‘गुड न्यूज’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तिकीटबारीवर हा चित्रपट सलमान खानच्या ‘दबंग ३’ला टक्कर देणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kareena kapoor khan on a second child saif i are happy with taimur ali khan dont have any plans scsg

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या