अभिनेत्री करीना कपूर खान पुन्हा आई होणार आहे. खुद्द सैफ व करीनाने ही आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली. सोशल मीडियावर या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याचसोबत बरेच मीम्ससुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पाहा भन्नाट मीम्स-

आपल्या घरी नवीन पाहुणा येणार हे जाणून तैमुरची प्रतिक्रिया कशी असेल, यावरून सोशल मीडियावर बरेच मीम्स व्हायरल झाले आहेत. तर करीनाची गोड बातमी ऐकल्यानंतर अनुष्का शर्माची विराटसाठी प्रतिक्रिया काय असेल यावरूनही भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

करीनाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास ती ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात नुकतीच झळकली होती. त्यानंतर ती करण जोहरच्या ‘तख्त’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा तिचा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे.

ऑक्टोबर २०१२ मध्ये सैफ-करीनाने लग्नगाठ बांधली. त्यानंतर २०१६ मध्ये करीनाने तैमुरला जन्म दिला. तैमुर तीन वर्षांचा असून सोशल मीडियावर त्याचे बरेच फोटो व व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर करीना व सैफ अली खानवर शुभेच्छांचा जोरदार वर्षाव होत आहे.