अभिनेत्री करिना कपूरने बॉलीवूडच्या आगामी ‘की अॅण्ड का’ या चित्रपटातील एका गाण्यात तब्बल ३२ किलोचा लेहंगा परिधान करून चित्रीकरण केल्याचे समजत आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने हा लेहंगा डिझाईन केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या संपूर्ण चित्रपटात करिना कपूर वेस्टर्न लूकमध्ये दिसणार आहे. मात्र, करिनाच्या भारतीय लूकचे चाहते असणाऱ्या चाहत्यांचा हिरमोड होऊ नये यासाठी ‘की अॅण्ड का’ मधील या गाण्यात करिनाचा लूक संपूर्णपणे भारतीय ठेवण्यात आला आहे. करिनाचा खास मित्र असलेल्या मनिष मल्होत्राने या गाण्यासाठी तयार केलेला ३२ किलो वजनाचा लेहंगा या गाण्याचे आकर्षण ठरणार आहे. या लेहंग्यावर खास चांदीसोन्याच्या तारा वापरून करण्यात येणाऱ्या झरदोसी पद्धतीचे नक्षीकाम करण्यात आले आहे. मुंबईतील एका स्टुडिओत या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे अंगाची लाही करणाऱ्या सध्याच्या वातावरणात इतक्या वजनाचा लेहंगा परिधान करून करिनाने तब्बल दोन दिवस न कंटाळता चित्रीकरण केले. आर.बाल्की दिग्दर्शित ‘की अॅण्ड का’ चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया भादुरी-बच्चन हे दोघेही दीर्घ कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 29th Oct 2015 रोजी प्रकाशित
‘की अॅण्ड का’ मधील गाण्यासाठी करिनाचा ३२ किलोचा लेहंगा
रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने हा लेहंगा डिझाईन केला आहे.
Written by रोहित धामणस्कर

First published on: 29-10-2015 at 15:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor wears 32 kg lehenga for ki and ka song