चित्रपट रसिकांकडून बायोपिकला चांगलीच पसंती दिली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून खेळाडू म्हणू नका किंवा मग एखादा कलाकार, त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाने नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. याच बायोपिकमध्ये आता आणखी एका रंजक कथेची भर पडली आहे. ती कथा आहे अभिनेत्री सनी लिओनीच्या आयुष्यावर भाष्य करणारी. ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’, असं या बायोपिक वेब सीरिजचं नाव असून त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
या वेब सीरिजमधून बऱ्याच अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. खुद्द सनीच यामध्ये झळकणार असून तिचा प्रवास चाहत्यांपर्यंत पोहोचवणार आहे. ४० सेकंदांच्या या टीझरमध्ये सनीच्या प्रवासाचा छोटा भाग पाहायला मिळतो. राजकीय पक्षाकडून सनीच्या एका कार्यक्रमावर बंदी घालण्यात आल्याची वर्तमानपत्रातील बातमीचा उल्लेखही यात पाहायला मिळतो.
My life will soon be an open book!
My journey from #KarenjitKaur to @sunnyleone premieres on 16th July 2018 only on @ZEE5India – https://t.co/LiOTTxjreZ #ZEE5Originals #KarenjitKaurOnZEE5 @namahpictures @freshlimefilms pic.twitter.com/lzk6ixJMm0— Sunny Leone (@SunnyLeone) July 1, 2018
या चित्रपटातील तिच्या पतीच्या भूमिकेवरुन काही दिवसांपूर्वीच तिने पडदा उचलला होता. मार्क बकनर हा दक्षिण आफ्रिकेचा अभिनेता या बायोपिकमध्ये तिच्या पतीच्या म्हणजेच डॅनिअल वेबरच्या भूमिकेत दिसेल. तर सनीच्या बालपणीची भूमिका साकारण्यासाठी रिसा सौजानी हिची निवड करण्यात आली आहे.
When your working with your co-star @marcbuckner and a bunch of ridiculousness is happening around you! @ADITYADATT @ZEE5India @namahpictures #karenjitkaur #doingitmyway pic.twitter.com/UHAsBnGK6Y
— Sunny Leone (@SunnyLeone) June 27, 2018
एक पॉर्न स्टार ते बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणारी सनी अनेकांसाठी नवी होती. पण, प्रेक्षकांनीही तिचा मोठ्या मनाने स्वीकार केला. १६ जुलै रोजी या वेब सीरिजचा पहिला भाग ZEE5 India वर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांचा या वेब सीरिजला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.