बिग बॉस १६ चा विजेता एमसी स्टॅन (MC Stan) हा गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहे. सध्या एमसी स्टॅन भारत दौऱ्यावर असून मोठ्या शहरांमध्ये आपले शो करताना दिसत आहे. मात्र, नुकताच एमसी स्टॅन याच्या इंदूर येथील शोमध्ये मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. करणी सेनेच्या (Karni Sena) कार्यकर्त्यांनी एमसी स्टॅन याच्या शोमध्ये गोंधळ घालत हा शो बंद पाडल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा- ‘तो’ एक किसिंग सीन अन् अभिषेक-राणीचं नातं तुटलं; अमिताभ बच्चन यांची सून होता होता राहिलेली अभिनेत्री
लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान, करणी सेनेच्या निषेधामुळे शो मध्येच थांबवावा लागला. एमसी स्टॅनच्या रॅपमध्ये असभ्य भाषेचा वापर केल्याबद्दल करणी सेनेने नाराजी व्यक्त केली होती. आता करणी सेनेचे युवा अध्यक्ष भागवत सिंह बलोत यांनी एमसी स्टॅनला इशारा दिला आहे.
युवक अध्यक्षांचा एमसी स्टॅनला इशारा
करणी सेना युथचे अध्यक्ष भागवत सिंग बालोट यांनी फिल्मी बीट या मनोरंजन पोर्टलशी बोलताना एमसी स्टॅनचा इंदूरमधील शो रद्द करण्यामागचे कारण सांगितले आहे. एमसी स्टॅनच्या गाण्यांमध्ये वापरल्या गेलेल्या अपशब्दांचा त्याचा परफॉर्मन्स पाहणाऱ्या तरुणाईवर परिणाम होणार असल्याची टीका केली आहे. तसेच ‘त्यांच्या गाण्यात असभ्य भाषा वापरणाऱ्या आणि महिलांचा अपमान करणाऱे शब्द असतात त्यामुळे त्यांना एमसी स्टॅनचा राग येत असल्याचेही’. सिंग म्हणाले.
प्रसिद्ध होण्यासाठी गाण्यात शिव्यांचा वापर
‘करणी सेनेने नेहमीच कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे, मात्र कोणी आक्षेपार्ह मजकूर आणि गाणी वापरल्यास त्याची किंमत चुकवावी लागेल’, असा इशाराही भावत सिंग यांनी दिला आहे. प्रसिद्ध होण्यासाठी लोक गाण्यात शिव्या देत असतात. तुमच्यात गाण्याची प्रतिभा आहे, तुम्ही नक्कीच गा, पण तुमच्या गाण्यात असे शब्द वापरू नका, असे आवाहनही सिंग यांनी केले आहे.