बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक नावाजलेल्या चित्रपटांचे रिमेक करण्यात आले आहेत. यामध्ये ९० च्या दशकातील अनेक चित्रपटांचा समावेश आहे. ‘देवदास’, ‘जंजीर’, ‘इत्तेफाक’, ‘डॉन’, ‘अग्निपथ’, ‘जुडवा’ यासारख्या चित्रपटांच्या रिमेकनंतर आता लवकरच १९७८मध्ये हिट ठरलेल्या ‘पती,पत्नी और वो’ या चित्रपटाचा रिमेक करण्यात येणार असून या रिमेकमध्ये कार्तिक आर्यन मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत असणार आहे. १९७८साली संजीव कपूर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. आता याच चित्रपटाच्या रिमेकमध्ये कार्तिक आर्यनसोबत अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर या अभिनेत्रींची वर्णी लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टी-सिरिझ आणि बीआर स्टुडिओ अंतर्गत या चित्रपटाची निर्मीती करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या रिमेकचेही नाव ‘पती पत्नी और वो’, हेच राहणार आहे. कथेत फक्त काही प्रमाणात बदल करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात कार्तिक पहिल्यांदाच अनन्या पांडे आणि भूमीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

१९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारित असून त्याला विनोदाची किनार आहे.या कारणास्तव हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. त्यामुळे पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं या हेतूने मुदस्सर अजीज यांनी रिमेक करण्याचा निर्णय घेतला आहे. मुदस्सर अजीज ‘पती,पत्नी और वो’ च्या रिमेकचं दिग्दर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे चित्रपटाचा मूळ आशय तोच ठेऊन यामध्ये मॉर्डन ट्विस्ट करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartik aaryan bhumi pednekar and ananya pandey br chopras evergreen classic patipatniaurwoh
First published on: 19-01-2019 at 14:48 IST