‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील पूनमची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत पूजा चाहत्यांच्या संपर्कात राहते. पूजा तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. पूजा ने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमुळे पूजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी पुजाच्या फोटो सोबत तिच्या कॅप्शनची ही चर्चा सुरु आहे.
पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पूजाने काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. त्यावर राखाडी आणि मेटलिक जॅकेट परिधान केलं आहे. पूजाच्या या बोल्ड फोटोसोबतच पूजाने दिलेल्या कॅप्शनने देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ‘काही लोकांसाठी मी कायमच एक वाईट मुलगी असणार आहे’, अशा आशयाचे कॅप्शन पूजाने त्या फोटोला दिले आहे. हे कॅप्शन देत पूजाने तिच्या ट्रोलर्सना उत्तर दिले आहे. पूजाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
आणखी वाचा : ‘तुला लाज वाटायला हवी, तू मुस्लीम आहेस’, कामाख्या देवीचे दर्शन घेतल्याने सारा झाली ट्रोल
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘माणूसकी आहे की नाही?’, ड्रायव्हरला पावसात भिजू दिल्याने सुझान आणि ताहिरा झाल्या ट्रोल
पूजाने २०११ मध्ये ‘रोडीज’मधून केली होती. यानंतर पूजाने ‘एक दूसरे से करते हैं प्यार हम’, ‘चंद्रनंदिनी’, ‘द एडव्हेंचर्स ऑफ हातीम’, ‘, ‘नागार्जुन-एक योद्धा’, ‘दिल ही तो है’, ‘चंद्रकांता’ और ‘विक्रम बेताल की रहस्य गाथा’ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.