कॉमेडियन कृष्णा अभिषेक व त्याची पत्नी अभिनेत्री कश्मीरा शाह हे जोडपं कायमच चर्चेत असतं. दोघंही अगदी सुखाचा संसार करत आहेत. कृष्णा-कश्मीराला जुळी मुलं आहेत. पण जुळी मुलं होण्यापूर्वी कश्मीराला अनेक विचित्र प्रसंगांचा सामना करावा लागला होता. तिच्या गरोदरपणात काही अडचणी निर्माण झाल्या. कश्मीराने एका मुलाखतीदरम्यान तिच्या खासगी आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधील अय्यर ४२व्या वर्षी करणार लग्न, अभिनेत्याची होणारी पत्नी मुनमुनपेक्षाही दिसते सुंदर
कश्मीरा नेहमीच प्रत्येक मुद्द्यावर खुलेपणाने बोलताना दिसते. कश्मीराने तिच्या खासगी आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. लग्नाच्या काही वर्षांनंतर तिला प्रेग्नेंसीसाठी अडचण निर्माण होत होती. लग्नानंतर १४ वर्ष ती आई बनण्याचा प्रयत्न करत होती.
१४ वर्ष प्रेग्नेंसीसाठी प्रयत्न करूनही तिच्या पदरी अपयश आलं. प्रेग्नेंसीमुळे कश्मीराला समाजाकडून सुनावण्यातही आलं. तिच्याबाबत नकारात्मक चर्चा होऊ लागल्या. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये ती मागे हटली नाही. कृष्णा व कश्मीराने आयवीएफचा आधार घेतला. कश्मीरा आयव्हीएफच्या आधारे आई बनणार आहे हे समजल्यानंतर लोकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.
आणखी वाचा – Video : तीन वेळा आयव्हीएफ, हाती अपयश अन् गंभीर आजाराचं निदान, अभिनेत्रीला कॅमेऱ्यासमोर अश्रू अनावर
शारिरीक रचना आहे तशीच राहावी म्हणून ती आयव्हीएफ करत आहे असंही अनेकांनी म्हटलं. पण या प्रक्रियेमध्ये बराच शारिरीक त्रास सहन करावा लागला असल्याचं कश्मीराने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. कश्मीराचं वजनही वाढलं. पण आज दोघंही आपल्या कुटुंबासह सुखाने संसार करत आहेत.