scorecardresearch

‘गाडीचा अपघात झाल्यानंतर टीमला माझ्यापेक्षा कॅमेऱ्याचीच जास्त चिंता होती’

या सिनेमाशी निगडीत अनेक गोष्टी समोर येत आहेत

salman khan, katrina kaif
सलमान खान आणि कतरिना कैफ

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याचा ‘टायगर जिंदा है’ सिनेमा येत्या २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसणार आहे. हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक था टायगर’ सिनेमाचा सिक्वल आहे. या सिनेमात कतरिना झोया ही व्यक्तिरेखा साकारत आहे. ‘टायगर जिंदा है’ मध्ये पहिल्या सिनेमापेक्षा जास्त अॅक्शन सीन कतरिनाच्या वाट्याला आले आहेत. ट्रेलरमध्ये तिने केलेल्या अॅक्शन सीनची झलक पाहायला मिळते.

यानंतर या सिनेमाशी निगडीत अनेक गोष्टी समोर येत आहेत. असे म्हटले जाते की, सलमान खान आणि कतरिना कैफसह टायगरची संपूर्ण टीम मोराक्कोमध्ये चित्रीकरण करत होते. एका सीनमध्ये सलमानला घोड्यावर बसून यायचे होते आणि कतरिनाला गाडीत बसून सीन करायचा होता. पण योग्य प्रशिक्षण देऊनही चित्रीकरणादरम्यान तिची गाडी भिंतीला जाऊन आदळली.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कतरिना म्हणाली की, ‘मला दुखापत होऊ शकली असती पण टीमला माझ्यापेक्षा गाडीत लावलेल्या महागड्या कॅमेऱ्याची जास्त चिंता होती. मला दुखापत झाली नाही आणि नंतर त्या सीनचेही चित्रीकरण झाले. ७ नोव्हेंबरला या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आतापर्यंत सर्वाधिक पाहिला गेलेला ट्रेलर म्हणून या सिनेमाने याआधीच विक्रम केला आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2017 at 21:08 IST

संबंधित बातम्या