बॉलिवूड दिवा कतरिना कैफ आतापर्यंत सोशल मीडियापासून चार हात लांबच होती. पण आता तिलाही सोशल मीडियाचं महत्त्व कळलं आहे असंच म्हणावं लागेल. ती २७ एप्रिलला इन्स्टाग्रामच्या मायाजाळात अडकली. फेसबुकनंतर कतरिनाने इन्स्टाग्रामवरही तिचे अकाऊंट सुरु केले. करण जोहरने कतरिना इन्स्टाग्रामवर एण्ट्री करण्यापूर्वी ट्विटरवर चाहत्यांना, ‘उद्या इन्स्टाग्रामवर कोण धमाकेदार एण्ट्री करणार,? असा प्रश्न विचारला होता. अनेकांनी करिना कपूर- खानचे नाव घेतले तर काहींनी कतरिनाचे. कतरिनानेही तिच्या फेसबुक अकाऊंटवरून ती इन्स्टाग्रामवर येणार असल्याचे संकेत दिले होते. अखेर तिने इन्स्टाग्रामवर तिचे अकाऊंट सुरू केले आणि काही क्षणात तिच्या चाहत्यांनी तिला फॉलोही केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चाहत्यांप्रमाणेच बी-टाऊनच्या अनेक सेलेब्सने तिचे वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत केले. यात सलमान खानचे नाव आघाडीवर असले तरी आलिया भट्ट, करण जोहर, रणवीर सिंगने त्यांच्या हटके अंदाजात तिचे इन्स्टावर स्वागत केले. आता कलाकारांच्या या शर्यतीत बॉलिवूडचा बादशहा तरी कसा मागे राहील. आज सुपरस्टार शाहरुख खाननेही त्याच्या अनोख्या अंदाजात त्याच्या लाडक्या अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर स्वागत केले.
शाहरुखने कतरिनासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत, ‘इन्स्टाग्राम आता आणखीनच सुंदर होईल. माझ्या मैत्रिणीचे स्वागत करा,’ असा सुरेख मेसेजही लिहिला. सुरूवातीच्या हॉट फोटोंनंतर कतरिनाने आणखी काही सुंदर फोटो इन्स्टाग्रावर पोस्ट केले.

याशिवाय, कतरिनाने ती झोपेतून उठल्यावर कशी दिसत असेल याबद्दल लोकांची असलेली कल्पना आणि प्रत्यक्षात ती झोपून उठल्यावर कशी दिसते, हे दाखवणाराही एक फोटो नुकताच शेअर केला. तिच्या या फोटोला हजारो लाइक्सही मिळाले. यानंतरच्या इंडिगो एअरलाईन्समधील आणखी एका छायाचित्रात ती एका छानशा उशीवर झोपलेली दिसत आहे. तर आणखी एका छायाचित्रात कतरिनाने सकाळच्या वेळेत होणारी तिची धावपळ दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif shah rukh khan instagram becomes prettier place for srk
First published on: 01-05-2017 at 21:28 IST